Friday, July 11, 2025

दसरा मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटाच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी

दसरा मेळाव्याला निघालेल्या शिंदे गटाच्या गाडीला अपघात; एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी

सांगली : आज मुंबईत होणा-या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईकडे येण्यासाठी निघाले आहेत. दरम्यान, सांगलीतून मेळाव्यासाठी येत असलेल्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.


मिळालेली माहिती अशी की, रत्नागिरी-नागपूर महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्यातून जात असताना एका ट्रकने पाठीमागून कारला धडक दिल्याने हा अपघात झाला. या कारमध्ये युवा सेनेचे पदाधिकारी होते.


आज मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचा शिवतीर्थावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. यासाठी दोन्ही गटाकडून मोठी तयारी केली आहे. पोलिसांनीही संपूर्ण परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >