Thursday, August 7, 2025

World Cup 2023 Points Table: न्यूझीलंडला हरवत भारताने पॉईंट्स टेबलमध्ये केला मोठा उलटफेर

World Cup 2023 Points Table: न्यूझीलंडला हरवत भारताने पॉईंट्स टेबलमध्ये केला मोठा उलटफेर

धरमशाला: भारतीय संघाने आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्धचा विजयाचा दुष्काळ अखेर संपवला. त्यांनी या विश्वचषकातील २१व्या सामन्यात धरमशालाच्या मैदानावर न्यूझीलंडला ४ विकेटनी मात दिली. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृ्त्वात भारतीयत संघाने विश्वचषक २०२३च्या पॉईंट्सटेबलमध्ये नंबर वनचा खिताब मिळवला आहे. हा खिताब आधी न्यूझीलंडकडे होता. भारताने धक्का दिल्यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.


भारताचा या स्पर्धेतील हा पाचवा विजय आहे. सामन्याआधी न्यूझीलंडनेही २०२३च्या विश्वचषकात एकही सामना गमावलेला नव्हता. मात्र टीम इंडियाने त्यांचा विजयरथ रोखला. भारतीय संघ सध्या पॉईंट्सटेबलमध्ये सर्वाधिक १० गुण गमावणारा संघ बनला आहे.



टॉप ४मध्ये हे चार संघ


टॉप ४ संघांबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघ पहिल्या स्थानावर तर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडने ५ पैकी ४ सामने जिंकले आहेत. टॉप ४मध्ये तिसऱ्या स्थानावर द. आफ्रिकेचा संघ आहे. त्यांनी ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलिया चौथ्या स्स्थानावर आहे.



इतर संघाची ही परिस्थिती


बाकी संघांमध्ये पाकिस्तान ४ सामन्यानंतर ४ पॉईंट्ससह आणि निगिटेव्ह रनरेटसह -०.४५६ सह पाचव्या, बांगलादेश सहाव्या, नेदरलँड्स सातव्या, श्रीलंका आठव्या, इंग्लंड नवव्या आणि अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment