Wednesday, July 17, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World cup 2023: अफगाणिस्तानचा पाकिस्तानला 'दे धक्का', मिळवला ८ विकेट राखून विजय

World cup 2023: अफगाणिस्तानचा पाकिस्तानला ‘दे धक्का’, मिळवला ८ विकेट राखून विजय

चेन्नई: चेन्नईच्या मैदानावर आज विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) आणखी एक धक्कादायक निकाल पाहायला मिळाला. याआधीच इंग्लंडला जोरदार धक्का देणाऱ्या अफगाणिस्तानने पाकिस्तानलाही जबरदस्त धक्का देत विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानने ५० षटकांत ७ बाद २८२ हा तगडा स्कोर उभा केला होता.

हा स्कोर पाहता अफगाणिस्तान आव्हान पेलेल का यात थोडी शंका व्यक्त केली जात होती. मात्र चेन्नईच्या मैदानावर चमत्कारच घडला. एखादा दिग्गज संघ ज्याप्रमाणे खेळतो त्याचप्रमाणे अफगाणिस्तानचा संघ खेळला. आणि फक्त खेळलाच नाही तर पाकिस्तानविरुद्ध जिंकलाही.

शेवटच्या काही षटकांमध्ये अफगाणिस्तानआणि पाकिस्तान यांच्यात चुरस पाहायला मिळाली. मात्र बॉलचा फरक वाढल्याने अफगाणिस्तानचा विजय सोपा झाला. पहिल्यांदा फलंदाजी कऱणाऱ्या पाकिस्तानी संघात अब्दुल्लाह शफीकने ५८ धावा केल्या. तर बाबर आझमने ७४ धावांची खेळी केली. त्यानंतर शादाब खानने ४० धावा तर इफ्तिखार अहमदने ४० धावा केल्या. याच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाला ७ बाद २८२ धावा करता आल्या.

दुसरीकडे पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानने दमदार सुरूवात केली. अफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांनी शानदार अर्धशतके ठोकताना भक्कम पाया रचला. रहमनुल्लाह गुरबाजने ६५ धावा केल्या तर इब्राहिम झारदानने ८७ धावांची खेळी केली. रहमत शाह ७७ धावांवर नाबाद राहिला तर हश्मतुल्लाह शाहिदी ४८ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानच्या गोलंदाजांना अफगाणिस्तानचे केवळ २ गडी बाद करण्यात यश मिळाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -