ढाका: बांगलादेशच्या राजधानी ढाकाजवळ(dhaka) सोमवारी रेल्वेचा मोठा अपघात(railway accident) झाला. यात दोन रेल्वेंची टक्कर झाली. या अपघातात १५ लोकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. ढाका ट्रिब्युनच्या रिपोर्टनुसार हा अपघात दुपारी किशोरगंजच्या भैरबमध्ये झाला. येथे एक मालगाडी प्रवासी रेल्वेला धडकली. दरम्यान, या अपघातात अधिक जिवितहानी होण्याची शक्यता आहे.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात राजधानी ढाकापासून साधारण ८० किमी अंतरावर भैरब येथे झाला. स्थानिक पोलीस अधिकारी सिराजुल इस्लाम यांच्या माहितीनुसार यात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या वाढू शकते. कारण तेथे बचावकार्य सुरू आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अनेक लोक रेल्वेच्या खाली अडकले होते. अनेक जखमी लोक विखुरलेल्या डब्यांच्या खाली होते. अग्निशमन दलाचे अधिकारी तेथे पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.
रिपोर्टनुसार, सध्या बचाव कार्य सुरू असून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. स्थानिक लोकही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…