
मुंबई: करण जोहर(karan johar) सध्या आपला शो कॉफी विथ करण ८(coffee with karan) मुळे चर्चेत आहे. याआधी करण जोहर रॉकी और रानी की प्रेम कहानी मुळे चर्चेचा विषय बनला होता. करण जोहर ५१ वर्षांचा झाला आहे. मात्र अद्याप त्याचे लग्न झालेले नाही. दम्यान २०१७मध्ये सरोगसीच्या माध्यमातून दोन जुळ्या मुलांना यश आणि रूहीला जन्म दिला होता.
बॉलिवूड हंगामा ओटीटी इंडिया फेस्टमध्ये करणने डेटिंग अॅपवर स्वत:ला रिजेक्ट केले जाण्याचा खुलासा केला. त्याने सांगितले की तो कसा एकबा मेंबरशिप बेस डेटिंग अॅपशी कनेक्ट कहोता. तेथे अनेक लोकांना टिक केले मात्र कोणीच त्याला रिस्पॉन्स दिला नाही आणि अनेकदा तो रिजेक्ट झाला. त्यानंतर त्याने डेटिंग अॅप सोडून दिले.
येथे पाहू शकता करण जोहरचा कॉफी विथ करण ८
करण जोहर आपला शो कॉफी विथ करण सीझन ८ साठी तयार आहे. त्याचा शो २६ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. पहिल्या एपिसोडचा प्रोमो आऊट झाला आहे. यात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह दिसत आहे. प्रेक्षक हा शो ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकतात.