Monday, July 1, 2024
Homeताज्या घडामोडीIsrael-Hamas war: पंतप्रधान मोदींनी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी केली चर्चा

Israel-Hamas war: पंतप्रधान मोदींनी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी केली चर्चा

तेल अवीव: इस्त्रायल(israel) आणि हमास(hamas) यांच्यात सात ऑक्टोबरपासून युद्ध सुरू आहे. यातच सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्डनचे किंग अब्दुल्ला द्वितीय यांच्याशी फोनवरून चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर सांगितले की, आम्ही दोघांनी पश्चिम आशियामध्ये या दिवसांमध्ये झालेल्या डेव्हलपमेंटवर चर्चा झाली. यावेळेस आम्ही दहशतवाद, हिंसा आणि सामान्य नागरिकांच्या मृत्यूबाबत चिंता व्यक्त केली.

पॅलेस्टाईनच्या राष्ट्रपतींशी केली होती चर्चा

पंतप्रधान मोदींनी याआधी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांशीही फोनवर चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदींनी अब्बासशी बातचीत करताना सांगितले होते की पॅलेस्टाईन प्राधिकरणाचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्याशी बातचीत केली.

मोदी पुढे म्हणाले, या दरम्यान मी गाझाच्या अल अहली रुग्णालयात नागरिकांच्या मृत्यूप्रकरणी संवेदना व्यक्त केली. आम्ही पॅलेस्टाईन लोकांचना मानवीय मदत पाठवत राहू. आम्ही या क्षेत्रातील दहशतवाद, हिंसा आणि बिघडत चालेलली सुरक्षा स्थितीवरही चिंता व्यक्त केली.

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात आतापर्यंत ६५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. अलजजिराच्या रिपोर्टनुसार पॅलेस्टाईनच्या गाझामध्ये ५०८७ आणि वेस्ट बँकमध्ये ९५ लोकांचा मृत्यू झालआ हे. तर इस्त्रायलच्या १४०५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -