Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीPalghar Drugs Factory : राज्यात पसरलंय ड्रग्जचं जाळं? आता पालघरमध्येही सापडला ड्रग्जचा...

Palghar Drugs Factory : राज्यात पसरलंय ड्रग्जचं जाळं? आता पालघरमध्येही सापडला ड्रग्जचा कारखाना

इतकी गुप्त कारवाई की स्थानिक पोलिसांनाही कल्पना दिली नव्हती…

पालघर : गेल्या काही दिवसांपासून राज्याच ड्रग्ज घोटाळ्याची (Drugs case) प्रचंड चर्चा आहे. पुण्यातील ससून रुग्णालयातून फरार झालेला ललित पाटील (Lalit Patil) पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर ड्रगजबाबत कारवाईला वेग आला असून आता राज्यभरात असलेल्या छुप्या ड्रग्जच्या कारखान्यांचा (Drugs Factory) उलगडा होत आहे. कालच मुंबई पोलिसांनी (Mumbai police) नाशिक (Nashik) येथे असलेल्या ललित पाटीलच्या ड्रग्ज कारखान्यावर कारवाई करत झाडाझडती घेतली. सोलापूर, नाशिक, संभाजीनगर या जिल्ह्यांत यापूर्वी ड्रग्ज कारखाने आढळून आले होते. यानंतर आता धक्कादायक बाब म्हणजे पालघर (Palghar) जिल्ह्यातही ड्रग्ज कारखाना आढळून आला आहे. यामुळे पालघर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात ड्रग्जचा कारखाना असल्याची माहिती मिराभाईंदर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मिराभाईंदर गुन्हे शाखेकडून पालघर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अत्यंत गुप्तपणे आणि सावधगिरी बाळगत ही कारवाई केली गेली. ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल देखील या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आला आहे. राज्यात अशा प्रकारे होणाऱ्या सलग कारवाईंमुळे ड्रग्ज तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

मोखाडा तालुक्यातील एका फार्म हाऊसवर हा कारखाना चालू होता. या कारवाईत कोट्यवधी रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती आहे. तसेच या संदर्भातील आरोपीला वसईमधून अटक करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक पोलिसांना याबाबत काहीच माहिती नव्हती. अशा कारवाईमुळे राज्यात अंमली पदार्थ विकणार्‍या टोळीचे कंबरडे मोडण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -