Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीHeart attack : गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू

Heart attack : गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने २६ वर्षीय तरूणाचा मृत्यू

गांधीनगर: गुजरातच्या(gujrat) सुरत शहरात एका तरूणाला गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका(heart attack) आला. यानंतर तो गरबा खेळण्याच्या पंडालमध्ये चक्कर येऊन पडला. त्याला तातडीने अॅम्ब्युल्सद्वारे रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

रोहित राठोड शहराजवळील बोनंद गावाच्या डुंगरी मोहल्ले येथे राहत होता. रविवारी रात्री घरासमोरील गरबा पंडालमध्ये तो गरबा खेळत होता. याच दरम्यान तो पंडालमध्ये चक्कर येऊन पडला. घरच्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात नेले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

डॉक्टरांचे शब्द ऐकताच घरच्यांवर कोसळला दु:खाचा डोंगर

डॉक्टरांवी रोहितला मृत घोषित करताच त्याच्या घरच्यांवर अक्षरश: दु:खाचा डोंगर कोसळला. त्याच्या मोठ्या भावाने प्रवीणने सांगितले की गावात सगळे गरबा खेळत होते. यातच त्याचा भाऊ गरबा खेळता खेळता खाली पडला. त्याला उपचारासाठी पलसाना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

रोहितला कोणताही आजार नव्हता, तो शेती करत होता

रोहितला कोणताही आजार नव्हता. त्याची पत्नी आणि त्याला एक मुलगी आहे. तो शेती करत होता. गेल्या २१ तारखेला गुजरातमध्येच गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली हती. २४ तासांत गरबा खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची ही १०वी घटना होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -