Monday, July 15, 2024
Homeक्रीडाBishan Singh Bedi : भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन

Bishan Singh Bedi : भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांचं निधन

वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : डावखुरे फिरकी गोलंदाज (left-arm spinner), २२ सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणारे आणि १९६०चं दशक गाजवलेले भारताचे माजी क्रिकेटपटू (Cricketer) बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांचं वयाच्या ७७व्या वर्षी निधन झालं आहे. दीर्घकालीन आजारामुळे (Prolonged illness) आज त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या उत्तम गोलंदाजी कौशल्याने त्यांनी अनेक सामन्यांतून फलंदाजांना चीतपट केले होते. बेदी यांनी भारताला पहिली वन डे मॅच जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.

बिशनसिंग बेदी या दिग्गज फिरकीपटूने १९६७ ते १९७९ दरम्यान भारतासाठी ६७ कसोटी खेळल्या आणि २६६ विकेट्स घेतल्या होत्या. तर, त्यांनी १० एकदिवसीय सामन्यांमध्ये सात विकेट्स घेतल्या होत्या. इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासमवेत बिशन सिंग बेदी हे भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या इतिहासात एका प्रकारच्या क्रांतीचे शिल्पकार होते.

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी प्रथम उत्तर पंजाबसाठी खेळले, तेव्हा ते फक्त पंधरा वर्षांचे होते. १९६८-६९ मध्ये ते दिल्लीला गेले आणि १९७४-७५च्या रणजी करंडक स्पर्धा त्यांनी गाजवली व ६४ विकेट्स घेतल्या. बेदी यांनी अनेक वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६० विकेट्ससह आपली कारकीर्द पूर्ण केली. त्यांच्या निधनाने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -