Kandivali fire news : कांदिवलीतील इमारतीला भीषण आग; दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी

मृतांमध्ये आठ वर्षांच्या चिमुकल्याचा समावेश


मुंबई : कांदिवली येथील महावीरनगर परिसरात वीणा संतूर इमारतीला भीषण आग (Kandivali fire news) लागली. या आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये आठ वर्षांच्या एका चिमुकल्याचाही समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल (Fire Brigade) ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्यात यश आले असून आगीचे कारण मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.


कांदिवली येथील वीणा संतूर इमारतीच्या ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर दुपारी बाराच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. परंतु आगीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशी लागली, याचा स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तपास करत आहेत.


या आगीत एका चिमुकल्यासह दोघांना आपला जीव गमवावा लागला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ग्लोरी (४३ वर्षे), जोसू रॉबर्ट (८ वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. तर लक्ष्मी बुरा (वय ४० वर्षे), राजेश्वरी भरतारे (२४ वर्षे), रंजन शाह (७६ वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री