Thursday, November 7, 2024
Homeदेशमध्य पूर्वमध्ये काय होत आहे हे अद्याप स्पष्ट नाही, इस्त्रायल-हमास युद्धावर आणखी...

मध्य पूर्वमध्ये काय होत आहे हे अद्याप स्पष्ट नाही, इस्त्रायल-हमास युद्धावर आणखी काय म्हणाले एस जयशंकर?

नवी दिल्ली: इस्त्रायल-हमास(israel-hamas) यांच्यात सुरू असलेले युद्ध आणि युक्रेन संघर्षाकडे इशारा करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले हा संघर्ष जागतिक अस्थिरता वाढवण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे. नवी दिल्लीत कौटिल्य इकॉनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना जयशंकर म्हणाले, मध्य पूर्वमध्ये जे काही आता होत आहे त्याचा प्रभाव अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही आहे.

न्यूज एजन्सी एएनआयच्या मते परराष्ट्रमंत्र्यांनी या गोष्टीवर जोर दिला की दहशतवाद एका दीर्घकाळापर्यंत एका टूलसारखा वापरत आलेला आहे. परराष्ट्र मंत्री म्हणाले, एकध्रुवीय जग आता दूरचा इतिहास आहे. अमेरिकन सोव्हिएत संघाची द्विध्रुवीयता जग आणखी दूर आहे आणि मला नाही वाटत की अमेरिकन-चीन खरोखरच द्विध्रुवीय जगात सामील होतील.

क्षेत्रीय ताकद वाढतेय

मला वाटते की आता सारेच पॉवरफुल देश आहेत जे प्रभाव आणि ऑटोनॉमीी अॅक्टिव्हिटीसह आपापला प्रभुत्व आणि प्रायव्हसीला घेऊन पुढे जात आहे. प्रमुख क्षेत्रीय ताकद आता आधीच्या तुलने इतके प्रभावी होत आहेत की जागतिक खेळाडू अथवा बाहेरच्या खेळाडूंना एंट्रीची परवानगी देत नाही.

जयशंकर म्हणाले, आधीच्या तुलनेत आज भारताची स्थिती खूप चांगली आहे. हे दाखवण्यासाठी खूप सारे पुरावे आहेत की आज आम्ही एक, दोन अथवा पाच दशकांच्या तुलनेत खूप चांगल्या स्थितीत आहोत.

कॅनडामध्ये व्हिसा सर्व्हिसवर काय म्हणाले जयशंकर

कॅनडामध्ये व्हिसा सर्व्हिसवर परराष्ट्र मंत्री म्हणाले, कॅनडासोबत आमचे सध्याचे संबंध अतिशय कठीण स्थितीत आहेत. मात्र आमच्यातील ज्या काही समस्या आहेत त्या कॅनडाच्या नितींमुळे आहेत. आता मोठ्या संख्याने लोक व्हिसाची चिंता करत आहेत. काही आठवड्यांआधी आम्ही कॅनडाला व्हिसा देणे बंदी केले होते कारण तेथे आमच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना जाणे सुरक्षित नव्हते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -