 
                            आमदार नितेश राणेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई : हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या विचारांशी ज्याने गद्दारी केली, खुर्चीसाठी बापाच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या दारी लोटांगण घातले, ज्याला आपलं घर नीट सांभाळता आलं नाही, दोन्ही मुलं वाया गेली आहेत, त्यांना तो संस्कार देऊ शकला नाही, तो अगर शिवतीर्थाच्या व्यासपीठावर येऊन मर्दानगीची भाषा करत असेल, तर लोक हसतील, अशा कठोर शब्दांत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फटकारले.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत शिवतीर्थावर जो दसरा मेळावा होणार आहे, तो विचारांचं सोनं देणार्यांचा असेल, तर अन्य ठिकाणी होणारा मेळावा चायनीज मॉडेल, डुप्लिकेट आहे, असा उल्लेख केला. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) दसरा मेळाव्याचाही उल्लेख करत ते म्हणाले की, अशा प्रकारचा मेळावा कुठे झाला तर त्याला संघाचा मेळावा बोलू शकत नाही. त्यांच्या या वक्तव्यांचा भाजप आमदार नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला.
नितेश राणे म्हणाले, संजय राजाराम राऊतला मी आठवण करुन देईन की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जो कार्यकर्ता असतो तो कधीही हिंदुत्वाशी गद्दारी करत नाही, देशभक्तीच्या, राष्ट्रवादी विचारांशी कधीही प्रतारणा करत नाही, आपल्या आईवडिलांचे संस्कार कधी विसरत नाही, म्हणून संघाच्या मेळाव्यामध्ये जे विचारांचं सोनं दिलं जातं ते तुझ्या मालकाच्या शिवतीर्थावर होणार्या मेळाव्यामध्ये कधीच दिलं जाणार नाही. कारण यावर्षी जो शिवतीर्थावर बोलणार आहे, तो एका बिघडलेल्या, नशेबाज, बलात्कारी मुलाचा, एक भडकलेला आणि चिंतीत असलेला बाप आहे. तो या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी शिवतीर्थावर बोलणार आहे.
उबाठावाल्यांचं या मेळाव्याचं एक मी टीझर मी पाहिलं. जसं आपण कुठल्या जातीचे आहोत यासाठी जात प्रमाणपत्र मिळतं तसं उद्या जर मर्दांना ते प्रमाणपत्र देणं सुरु केलं तर उद्धव ठाकरेला ते कधीच मिळणार नाही. कारण कुठल्याही मर्दाला मी किती मर्द आहे, हे सांगण्याची कधीच गरज भासत नाही. जे नामर्द असतात, जे नपुंसक असतात त्यांना परत परत हे सांगायला लागतं. एका मर्दाच्या पोटी जन्माला येऊनही उद्धव ठाकरेंसारखा नपुंसक आणि नामर्द, ज्याने आपल्या हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली, ज्याला घर नीट सांभाळता आलं नाही, दोन्ही मुलं वाया गेली आहेत, त्यांना तो संस्कार देऊ शकला नाही, तो अगर शिवतीर्थाच्या व्यासपीठावर येऊन मर्दानगीची भाषा करत असेल, तर लोक हसतील, असं नितेश राणे म्हणाले.
पोलिसांच्या गराड्यात कोणीही मर्द बनत नाही
नितेश राणे म्हणाले, तुम्ही जर एवढेच मर्द असाल, तर सरकारने तुम्हाला दिलेलं संरक्षण बाजूला करुन शिवतीर्थावर येऊन दाखवा. आणि आमच्या भाजप आणि महायुतीच्या नेत्यांविरुद्ध बोलून दाखवा, तुम्ही परत मातोश्रीपर्यंत कसे जाताय ते आम्ही बघतो. पण पोलिसांच्या गराड्यात कोणीही मर्द बनत नाही. म्हणून संजय राऊतलाही सांगेन की फॅशन स्ट्रीट आणि गांधी मार्केटमध्ये तुझ्यासारखा डुप्लिकेट माल उपलब्ध आहे, असं नितेश राणे म्हणाले.
डॉक्टर महिलेला न्याय देऊन दाखव
काल एका डॉक्टर महिलेने केलेल्या ट्विटमध्ये तिने म्हटलं आहे की, जो सकाळचा तुझा भोंगा वाजतो तो तिला कसा त्रास देतोय आणि कसं तिचं आयुष्य त्याने कसं बरबाद केलंय. त्यामुळे जर तू खरा मर्द असशील तर त्या डॉक्टर महिलेला, दिशा सालियनला न्याय देऊन दाखव आणि या मग या पद्धतीचे टीझर लॉन्च कर. तसंही उद्या अगर आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर भाषण करायला लागला तर बाहेर रस्त्यावर उभ्या असलेल्या माणसाला कळणारही नाही की पुरुष बोलतोय की महिला बोलतेय, अशी टीका नितेश राणे यांनी केली.
आमचं मर्द मराठा सरकार अशा जाहिराती छापू शकतं
आज वर्तमानपत्रांत मराठ्यांना दिलेल्या लाभांविषयी राज्य सरकारची जाहिरात छापून आली आहे, त्यावर पत्रकाराने प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले, मनोज जरांगे ज्या काही सभा घेत आहेत त्याप्रमाणे चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे, आणि दुसरीकडे महायुती सरकार प्रामाणिक पद्धतीने मराठ्यांना प्रमाणपत्रं मिळावं यासाठी मंत्रालयात बैठका घेत आहेत. ते होत असताना उद्धव ठाकरेंच्या सरकारप्रमाणे आम्ही गप्प बसलेलो नाही. पण ईडब्ल्यूएस असेल, सारथी असेल अशा विविध महामंडळांच्या माध्यमातून मराठ्यांच्या मुलांना जी जी आर्थिक मदत मिळते ती सर्व हक्काने देण्याचं काम आमचं राज्य सरकार करत आहे. म्हणूनच, आमचं मर्द मराठा सरकार अशा जाहिराती छापू शकतं कारण आम्ही कोणाचीही फसवणूक केलेली नाही.
नितेश राणेंचा जरांगे पाटलांना सल्ला
नितेश राणे म्हणाले, मराठा आंदोलकांवर ज्या काही चुकीच्या केसेस होत्या त्या सगळ्या काढण्याचं काम आमच्या राज्य सरकारने केलं आहे. जरांगे पाटलांना मी आवर्जून सांगेन की एका बाजूला मराठा आरक्षणाची मागणी तुम्ही करताय त्यासाठी सरकार तुमच्याबरोबर आहे. पण त्याचबरोबर मराठ्यांच्या हितासाठी सरकारने अनेक चांगली कामं केली आहेत, ती जेव्हा तुमच्या भाषणांमध्ये तुम्ही बोलायला लागाल तेव्हाच समाजाला विश्वास वाटेल की, हा माणूस चांगल्याला चांगलं म्हणतो आणि ते म्हणणार्यालाच मराठा म्हणतात, हे जरांगे पाटलांनी लक्षात ठेवावं.

 
     
    




