Saturday, June 29, 2024
Homeसाप्ताहिककोलाजMarathi serial : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’त नवा ट्वीस्ट;

Marathi serial : ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’त नवा ट्वीस्ट;

  • ऐकलंत का! : दीपक परब

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही या छोट्या पडद्यावरील मालिकेने गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचे चांगलच मनोरंजन केले आहे. आता या मालिकेत लवकरच पंचपिटिका रहस्याचा जन्म होणार आहे.

पद्माकर आजोबांच्या मृत्यूनंतर राजाध्यक्ष कुटुंब इंद्राणीला बेघर होऊ देत नाही. तिला घरातच राहू दिले जाते. पण इंद्राणीला काहीतरी चुकल्यासारखे वाटते, अशातच एके दिवशी द्विधा मनस्थितीत असताना इंद्राणीला साधू भेटतात, जे तिला लहानपणीही भेटले होते. ते तिला सांगतात त्रिनयना देवीने तुझ्यावर नेत्राला वाचवण्याची जबाबदारी सोपवली आहे. या मालिकेत प्रेक्षकांनी हे पाहिले की आपल्या वरदानाचा उपयोग करून नेत्राने अव्दैतचा मृत्यूयोग टाळला आहे. परंतु त्रिनयना देवीचे वरदान असलेल्या स्त्रियांसाठी असलेले नियम नेत्राने मोडले आहेत.एके दिवशी नेत्राच्या नाकातून रक्त येऊ लागते. आता कदाचित पुढील मृत्यू नेत्राचाच होऊ शकतो, अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इंद्राणी नेत्राला सांगते की त्रिनयना देवी ग्रंथ वाचला तर काहीतरी मार्ग सापडेल. पण त्याचवेळी भालबा येऊन सांगतात, की त्रिनयना देवीचा ग्रंथ पुन्हा मंदिरात ठेवला तर नेत्राचा मृत्यूयोग कदाचित टळू शकतो. भालबा नेत्राला सूचना देतात की ग्रंथ मंदिरात ठेवण्यापूर्वी त्याच्या प्रत्येक पानावर हळदीकुंकू लाव आणि देवीचा मंत्र म्हण. भालबांनी सांगितल्याप्रमाणे नेत्रा ग्रंथाला हळदीकुंकू लावत असताना ग्रंथावर तिच्या डोळ्यातील अश्रू पडतात आणि त्यातून पंचपिटिका हा शब्द उमटतो. काय असेल हे पंचपिटिका रहस्य, त्याचा शोध नेत्रा कसा घेणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना ही मालिका पाहावी लागणार आहे. ‘ या मालिकेतील नवे ट्वीस्ट जाणून घेण्यासाठी मालिकाप्रेमी उत्सुक आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -