Navratri poems : काव्यरंग

दसरा


चैतन्य उधळीत
दिवस उगवला हसरा
उत्सव आनंदाचा
घेऊन आला दसरा

रांगोळी शोभे अंगणी
झेंडूचे तोरण दारी
स्नेहभाव वाढवूनी
कटुता विसरूया सारी

आपट्याची पानं
सोनं म्हणून लुटूया
सुख-समाधान
एक दुसऱ्याला वाटूया

श्रीरामाचा आदर्श घेऊनी
अहंकाराचा करूया नाश
एकतेचा मंत्र जपूनी
तोडूया विषमतेचे पाश

आदराने नमस्कार करूनी
थोरांना देऊया मान
मराठी सणांचा
आम्हा सदा अभिमान

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

नारीशक्तीला सलाम!!


नवरात्रीच्या नऊ नारी
आहेत लय भारी...

पहिला मान -
आपल्या हृदयी आईला
तिने शिकविले बोलायला...

दुसरा मान -
आपल्या क्रांतिज्योती सावित्री मातेला
तिने शिकविले लिहायला...

तिसरा मान -
आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेला
तिने शिकविले
न्याय करायला...

चौथा मान -
आपल्या त्यागमूर्ती
रमाई मातेला
तिने शिकविले त्यागातून प्रोत्साहन द्यायला...

पाचवा मान -
आपल्या राजमाता अहिल्यामातेला
तिने शिकविले समानतावादी राहायला...

सहावा मान -
आपल्या झाशीची
राणी लक्ष्मीमातेला
तिने शिकविले अत्याचाराशी लढायला...

सातवा मान -
आपल्या ऑफिस
बाॅस मॅडमला
तिने शिकविले
वेळेवर यायला...

आठवा मान -
आपल्या सर्व शेजारणींला
तिने शिकविले सहकार्य करायला...

आणि शेवटचा
नववा मान -
समस्त सर्व पत्नीवर्गाला
तिने शिकविले
तडजोड करायला...

~ विलास देवळेकर
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले

चोराच्या उलट्या बोंबा

प्रतिभारंग-प्रा. प्रतिभा सराफ एक गमतीशीर घटना सांगते. एक अमेरिकन बाई पायऱ्या उतरत होती. पायऱ्या अतिशय

एका भुताची गोष्ट!

कथा-रमेश तांबे एक होतं भूत. त्याला रोज रोज स्मशानात राहायचा खूप कंटाळा आला होता. तो म्हणायचा, काय हे आमचे जीवन. या

योगायोग काय असतो पहा!

स्मृतीपटल-अनिल रा. तोरणे यशस्वी पुरुषाच्या यशामागे एका स्त्रीचा हात असतो, असे अनेकदा बोलले जाते; परंतु

कृतघ्नता

मनस्विनी-पूर्णिमा शिंदे केलेल्या उपकारांची जाण न ठेवणे म्हणजे कृतघ्नता! उपकाराची फेड अपकाराने!! उपकार