Monday, August 25, 2025

Navratri poems : काव्यरंग

Navratri poems : काव्यरंग

दसरा

चैतन्य उधळीत दिवस उगवला हसरा उत्सव आनंदाचा घेऊन आला दसरा रांगोळी शोभे अंगणी झेंडूचे तोरण दारी स्नेहभाव वाढवूनी कटुता विसरूया सारी आपट्याची पानं सोनं म्हणून लुटूया सुख-समाधान एक दुसऱ्याला वाटूया श्रीरामाचा आदर्श घेऊनी अहंकाराचा करूया नाश एकतेचा मंत्र जपूनी तोडूया विषमतेचे पाश आदराने नमस्कार करूनी थोरांना देऊया मान मराठी सणांचा आम्हा सदा अभिमान - रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

नारीशक्तीला सलाम!!

नवरात्रीच्या नऊ नारी आहेत लय भारी... पहिला मान - आपल्या हृदयी आईला तिने शिकविले बोलायला... दुसरा मान - आपल्या क्रांतिज्योती सावित्री मातेला तिने शिकविले लिहायला... तिसरा मान - आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ मातेला तिने शिकविले न्याय करायला... चौथा मान - आपल्या त्यागमूर्ती रमाई मातेला तिने शिकविले त्यागातून प्रोत्साहन द्यायला... पाचवा मान - आपल्या राजमाता अहिल्यामातेला तिने शिकविले समानतावादी राहायला... सहावा मान - आपल्या झाशीची राणी लक्ष्मीमातेला तिने शिकविले अत्याचाराशी लढायला... सातवा मान - आपल्या ऑफिस बाॅस मॅडमला तिने शिकविले वेळेवर यायला... आठवा मान - आपल्या सर्व शेजारणींला तिने शिकविले सहकार्य करायला... आणि शेवटचा नववा मान - समस्त सर्व पत्नीवर्गाला तिने शिकविले तडजोड करायला... ~ विलास देवळेकर
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment