Lalit Patil dtugs case : ललित पाटीलचा ड्रग्ज कारखाना; मुंबई पोलिसांची शिंदे गावात झाडाझडती

तीन पथकांनी ललित -भूषणला सोबत घेऊन केली चौकशी


नाशिक : नाशिक येथील शिंदे गावात एमडी ड्रग्स अड्ड्याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक संशयित आरोपी ललित पाटील याच्यासह रविवारी ( दि. २२ ) सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान शिंदे गावात हजर झाले. त्यांनी शिंदे गावातील ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत असलेल्या एमडी ड्रग्स अड्ड्याची तपासणी केली. यामुळे शिंदे गावात सर्वत्र चर्चा अन खळबळ उडाली. मागील रविवारी (दि.१५ ) पुणे पोलिसांचे पथक शिंदे गावात ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला घेऊन दाखल झाले होते. त्यांनी देखील एमडी ड्रग्स अड्ड्याची पाहणी करत काही कामगारांची चौकशी केली होती.


संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ललित पाटील याला घेऊन मुंबई पोलीस शिंदे गावात आले होते. अतिशय गुप्त पद्धतीने पोलिसांचे पथक शिंदे गावात दाखल झाले अन तितक्याच गुप्त पद्धतीने निघून गेले. दोन वाहनांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश पोलीस पथकात होता. दरम्यान डोंगरावर निर्जन ठिकाणी असलेला हा अड्डा साकीनाका पोलिसांनी अगोदर शोधून काढला होता. त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरत पोलिसांनी अगोदर भूषण पाटील आणि त्याचा भाऊ ललित पाटील या दोघांनाही अटक केली आहे.



कंपनीची माहिती फलकावर नाही


शिंदे गावात बहुतांश छोट्या कंपन्या आहेत, काही मोठ्या देखील कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीच्या बाहेर कंपनीचे नाव, उत्पादनाचा फलक लावलेला असतो. कर्मचाऱ्यांची माहिती देखील संबंधित विभागाला देणे आवश्यक असत. पण शिंदे औद्योगिक वसाहतीतील बहुतेक कंपन्यांच्या बाहेर फलकच दिसत नाही.



नाशिकचे पोलीस काय म्हणाले?


नाशिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके म्हणाले, "शिंदे गावात रविवारी ड्रग्स अड्ड्याच्या तपासणीसाठी मुंबई पोलिसांचे पथक आले होते. याविषयी कल्पना होती. याप्रकणातील चौधरी नावाच्या संशयीत आरोपीला घेऊन पोलीस घेऊन येणार असल्याची नोंद आमच्याकडे आहे. सोबत ललित पाटील देखील होता. पोलिसांच्या तीन टीम असल्याची माहिती मिळाली होती.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

‘वंदे मातरम्’ सार्ध शताब्दी वर्षानिमित्त राजगुरुनगर येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी

नाशिकमध्ये गाजत असलेल्या महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला न्यायालयाने २९ मार्चपर्यंत पोलीस

अमरावती होणार उद्योगांचे नवे केंद्र! ५९० रुपयांत मिळणार जमीन

मुंबई : अमरावतीत अधिकाधिक उद्योग आणण्यासाठी शासन कटिबद्ध असून, त्यासाठी अमरावतीत संबंधित अधिकाऱ्यांच्या समवेत

पुणे - पंचवीस जणांना मिळणार युरोपियन स्पेस सेंटरला भेट देण्याची संधी

पुणे : इस्रो आणि नासा भेटीचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर जिल्हा परिषदेचे विद्यार्थी आता आणखी मोठी झेप घेणार आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजांची २५ मार्चपासून ऑनलाईन नोंदणी

सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा व

Ashok Kharat case : पीडितांच्या आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यास होणार गुन्हा दाखल

मुंबई : अशोक खरात प्रकरणानंतर सोशल मीडियावर पीडित महिलांबाबत आक्षेपार्ह मजकूर, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल