Thursday, July 18, 2024
Homeताज्या घडामोडीLalit Patil dtugs case : ललित पाटीलचा ड्रग्ज कारखाना; मुंबई पोलिसांची शिंदे...

Lalit Patil dtugs case : ललित पाटीलचा ड्रग्ज कारखाना; मुंबई पोलिसांची शिंदे गावात झाडाझडती

तीन पथकांनी ललित -भूषणला सोबत घेऊन केली चौकशी

नाशिक : नाशिक येथील शिंदे गावात एमडी ड्रग्स अड्ड्याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक संशयित आरोपी ललित पाटील याच्यासह रविवारी ( दि. २२ ) सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान शिंदे गावात हजर झाले. त्यांनी शिंदे गावातील ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत असलेल्या एमडी ड्रग्स अड्ड्याची तपासणी केली. यामुळे शिंदे गावात सर्वत्र चर्चा अन खळबळ उडाली. मागील रविवारी (दि.१५ ) पुणे पोलिसांचे पथक शिंदे गावात ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला घेऊन दाखल झाले होते. त्यांनी देखील एमडी ड्रग्स अड्ड्याची पाहणी करत काही कामगारांची चौकशी केली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या एमडी ड्रग्स प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ललित पाटील याला घेऊन मुंबई पोलीस शिंदे गावात आले होते. अतिशय गुप्त पद्धतीने पोलिसांचे पथक शिंदे गावात दाखल झाले अन तितक्याच गुप्त पद्धतीने निघून गेले. दोन वाहनांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश पोलीस पथकात होता. दरम्यान डोंगरावर निर्जन ठिकाणी असलेला हा अड्डा साकीनाका पोलिसांनी अगोदर शोधून काढला होता. त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरत पोलिसांनी अगोदर भूषण पाटील आणि त्याचा भाऊ ललित पाटील या दोघांनाही अटक केली आहे.

कंपनीची माहिती फलकावर नाही

शिंदे गावात बहुतांश छोट्या कंपन्या आहेत, काही मोठ्या देखील कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीच्या बाहेर कंपनीचे नाव, उत्पादनाचा फलक लावलेला असतो. कर्मचाऱ्यांची माहिती देखील संबंधित विभागाला देणे आवश्यक असत. पण शिंदे औद्योगिक वसाहतीतील बहुतेक कंपन्यांच्या बाहेर फलकच दिसत नाही.

नाशिकचे पोलीस काय म्हणाले?

नाशिकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके म्हणाले, “शिंदे गावात रविवारी ड्रग्स अड्ड्याच्या तपासणीसाठी मुंबई पोलिसांचे पथक आले होते. याविषयी कल्पना होती. याप्रकणातील चौधरी नावाच्या संशयीत आरोपीला घेऊन पोलीस घेऊन येणार असल्याची नोंद आमच्याकडे आहे. सोबत ललित पाटील देखील होता. पोलिसांच्या तीन टीम असल्याची माहिती मिळाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -