धरमशाला : विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात टीम इंडियाच्या मोहम्मद शमीने ५४ धावा देत पाच विकेट मिळवल्या. धरमशालाच्या मैदानावर या वेगवान गोलंदाजाने आपल्या कामगिरीने केवळ ३००चा स्कोर गाठण्यासाठी जाणाऱ्या किवी संघाला २७३ धावांवर गुंडाळले. इतकंच नव्हे तर स्पर्धेत आतापर्यंत त्याच्या जागी शार्दूल ठाकूरला दिलेल्या टीम मॅनेजमेंटचा निर्णय चुकीचा ठरवला.
सोबतच आपल्या खेळाडूंमध्ये लाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या शमीने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात जबरदस्त कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले.
Mohammed Shami marks his @cricketworldcup comeback with a fiery five-wicket haul 🔥@mastercardindia Milestones 🏏#CWC23 | #INDvNZ pic.twitter.com/fk5xKym4ba
— ICC (@ICC) October 22, 2023
विश्वचषक २०२३मधील आपल्या पहिल्या सामन्यात खेळताना शमीने किवी फलंदाज विल यंग, रचिन रवींद्र, डेरिल मेचेल, मिचेल सँटनर आणि मॅट हेन्री यांचे विकेट मिळवले. या विश्वचषकात पाच विकेट घेणारा तो तिसरा गोलंदाज ठरला आहे.
शमीच्या आधी न्यूझीलंडचा मिचेल सँटनर आणि पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने ही कामगिरी केली आहे. आपल्या सुरूवातीच्या दोन स्पेलमध्ये विल यंग आणि रचिन रवींद्र यांना बाद करणाऱ्या शमीने ४८व्या ओव्हरच्या चौथ्या आणि पाचव्या बॉलवर मिचेल सँटनर आणि मेट हेन्रीला बोल्ड करत सलग झटके दिले.
२०१९च्या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेणाऱ्या शमीला या सामन्यात हॅटट्रिक करता आली नाही मात्र त्याने शतकवीर डेरिल मिचेलला विराट कोहलीकडे झेल देत आपला पाचवा विकेट मिळवला. सामन्यात शमी भारताचा सगळ्यात महत्त्वाचा गोलंदाज ठरला.