तेल अवीव: इस्त्रायल-हमास युद्ध दोन सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. या युद्धामुळे मिडल इस्ट मध्ये पु्न्हा अशांततेचे वातावरण पसरले आहे. केवळ इतकेच नव्हे तर हे युद्ध पॅलेस्टाईन लोकांसाठी मोठे संकट बनून उभे राहिले आहे.
हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीवर ज्या पद्धतीने बॉम्बहल्ला केला. त्यामुळे संपूर्ण जग हैराण झाले आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलने गाझा पट्टीवर ज्या पद्धतीने बॉम्बहल्ला केला. त्यामुळे जगाला हैराण करून सोडले आहे.
गाझामध्ये इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात ४३८५ पॅलेस्टाईन लोकांचा मृत्यू झाला आहे. हमासने ७ ऑक्टोबरला इस्त्रायलमध्ये घुसून आणि त्यांच्यावर रॉकेट्सने हल्ला केला. या हल्ल्यात १४००हून अधिकांचा जीव गेला आहे. हल्ल्यानंर इस्त्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरू झाले.
इस्त्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्येही जेनिन शरणार्थी कँपवर हल्ला केला आहे. हा हल्ला रविवारी करण्यात आला. यात दोन पॅलेस्टाईन मेडिकल वर्कर्सचा मृत्यू झाला.