Tuesday, July 1, 2025

Parineeti Chopra: परिणीतीच्या बर्थडेला नवऱ्याने केले असे खास विश, पोस्टमध्ये लिहिले...

Parineeti Chopra: परिणीतीच्या बर्थडेला नवऱ्याने केले असे खास विश, पोस्टमध्ये लिहिले...

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti chopra) आज आपला जन्मदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने तिचा पती राघव चढ्ढाने तिला खास अंदाजात बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच राघवने आपल्या पत्नीसोबतचे अनेक न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत.



परिणीती चोप्राच्या बर्थडेला राघव चढ्ढाने केले असे विश


राघव चढ्ढाने परिणीती चोप्रासोबतचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, तु एका सुपरस्टारप्रमाणे माझे जीवन उजळत आहेस पारू! तुझे एक हास्य माझेी अस्ताव्यस्त झालेली लाईफ चांगली बनवू शकतो. तु माझ्या आयुष्यातील खूप आनंद आणला आहेत. या खास दिवशी मी त्या बेस्ट महिलेचा बर्थडे करणार आहे जी तु आहेत. या फोटोजमध्ये हसू, प्रेम आणि सर्वोत्तम क्षण आहे जे आपल्या पहिल्या वर्षातील सुंदर क्षण. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.


 



 










View this post on Instagram























 

A post shared by Raghav Chadha (@raghavchadha88)





२२ ऑक्टोबर १९८८मध्ये अंबालामध्ये परिणीची चोप्राचा जन्म झाला होता. ही अभिनेत्री ३५ वर्षांची झाली आहे. लग्नानंतर अभिनेत्री आपला पहिलाच वाढदिवस साजरा करत आहे. परिणीती आणि राघवने आपले लग्न तसेच त्याच्याशी संबंधित अनेक फंक्शन खूपच खासगीत साजरे केले होते. कोणलाही लग्नाचे फोटो अथवा क्लिप्स क्लिक करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. दरम्यान, जोडप्याने सोशल मीडियावर लग्नानंतर खास फोटो शेअर केले होते.


परिणीती आणि राघव यांनी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये एकमेकांसोबत साताजन्माची गाठ बांधली होती. परिणीती आपल्या या महत्त्वाच्या दिवशी मनीष मल्होत्राच्या बेज कलरच्या लेहंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा