शैलेश पालकर
पोलादपूर : शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त शिवछत्रपतींच्या प्रतापाची महती कथन करणाऱ्या किल्ले प्रतापगडावर शुक्रवारी रात्री मशाल महोत्सवाला हजारो स्त्री-पुरूष शिवभक्त आणि देवीभक्तांची गर्दी उसळली होती. वाडा कुंभरोशीपासून वाहनांची दाटी झाल्याने प्रतापगडापर्यंत असंख्य भाविकांना पायीवारी करावी लागली. मात्र, या वाढत्या गर्दीमुळे संभाव्य अपघात अथवा अग्नितांडवावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाने याठिकाणी अग्निशमन यंत्रणा तसेच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याची आवश्यकता उघड झाली आहे.
प्रतापगड किल्ल्यावर दरवर्षीप्रमाण यंदा ३६४ व्या मशाल महोत्सवाचे आयोजन सहाव्या माळेला करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री चंद्रकांतआप्पा उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असता हजारो शिवभक्त व देवीभक्तांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला. प्रतापगडाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची दाटी झाल्याने वाडा कुंभरोशीपासून पायीवारी करणाऱ्या शिवभक्त आणि देवीभक्तांकडून पावलोपावली छ. शिवाजी महाराज आणि देवीभवानी मातेचा जयघोष केला जात होता.
रेडका बुरूज, सूर्यबुरूज आणि यशवंत बुरूजाप्रमाणेच जिवाजी महाले या टेहळणी बुरूजावरदेखील मशाली आणि फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण उत्साहवर्धक झाले होते.
फटाक्यांची आतिशबाजी आणि ढोल-ताशा, शिंग, तुतारीच्या निनादात प्रतापगडावरील गर्दीला वीरश्री संचारल्याचे दिसून येत होते. मशाल महोत्सवानंतर गडावरून खाली पायउतार होताना पादचारी आणि वाहनांची दाटीमुळे वाहतुक कोंडी तयार करीत होती. यावेळी कोणत्याही अपघाताची शक्यता लक्षात घेता याठिकाणी किमान नवरात्रोत्सव संपेपर्यंत रुग्णवाहिका तैनात ठेवण्याची आवश्यकता दिसून येत असून मशाल महोत्सवादरम्यान गडावरील वाळलेल्या गवताने अथवा कापडी छताने पेट घेतल्यास कोणत्याही प्रकारचे अग्नितांडव घडू नये, यासाठी अग्निशमन यंत्रणेची गरज दिसून येत होती.
प्रतापगडावर श्रीदेवी भवानीमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषासह संभाजी भिडे गुरूजींचे अनुयायी त्यांच्या कवनांचे समूहगायन करीत होते. श्रीदेवी भवानीआई मंदिराबाहेर ढोलपथक, लेझीमपथक आणि गरबा रास यांचे आयोजन करण्यात आले. सुमारे पाच ते सहा हजार देवीभक्त आणि शिवभक्तांसाठी दोन-तीन ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे भाविकांनी हॉटेलमध्ये न जाता या महाप्रसादाचाच येथेच्छ आस्वाद घेतला.
मशाल महोत्सवात हजारो शिवभक्त व देवीभक्तांनी प्रचंड उत्साहात प्रतिसाद दिला. टेहळणी बुरूजावरील भगवा फटाक्यांच्या आतिशबाजीत प्रतापगड अधिकच खुलून दिसत होता. बुरूजापर्यंत ३६२ मशालींनी परिसर उजळून निघाला होता. चौथ्या छायाचित्रात तटबंदीवर मशाली प्रज्वलित करताना शिवभक्त. दिंडी दरवाजामध्ये आगीचे फुत्कार सोडणारे मावळे पाचव्या तर सहाव्या दृश्यात संपूर्ण उत्साहवर्धक दृश्ये मोबाईलवर टिपण्यासाठी सरसावलेले हौशी छायाचित्रकार. सातव्या दृश्यात श्रीभवानीमंदिराला प्रदक्षिणा घालताना मानकरी तर शेवटच्या दृश्यात स्वराज्य ढोलपथकाची जुगलबंदी रंगली.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…