Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीPolice Memorial Day : पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री दादा भुसे यांनी केले...

Police Memorial Day : पोलीस स्मृती दिनानिमित्त पालकमंत्री दादा भुसे यांनी केले अभिवादन

नाशिक : देशाच्या प्रती कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलीसांच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन (Police Memorial Day) म्हणून पाळला जातो. या स्मृती दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी आज पोलीस कवायत मैदान, नाशिक येथे पोलीस स्मृतीस्थळास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, विशेष पोलीस उपमहानिरीक्षक डॉ बी. जी. शेखर पाटील, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्यासह पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री दादा भुसे म्हणाले, २१ ऑक्टोबर, १९५९ रोजी लडाख येथे हॉटस्प्रिंग याठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शिपायांच्या तुकडीवर चीनी लष्कराच्या सैन्याने पूर्वतयारीनिशी हल्ला केला होता. यात १० शूर शिपायांनी शत्रुशी निकराने लढा देत देशासाठी आपले देह धारातीर्थी ठेवले. तेव्हापासून २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाच्या वतीने स्मृतीदिन म्हणून पाळला जातो. या शब्दात पालकमंत्री दादा भुसे यांनी आजच्या दिवसाचे महत्व विषद केले. यावेळी मैदानावर उपस्थित पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनीही स्मृतीस्थळास अभिवादन केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -