मुंबई : भारतीय मनोरंजन उद्योगातील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने तिचा पती विकी जैन सोबत बिग बॉस १७ च्या (Bigg Boss 17) घरात प्रवेश करून चर्चेत आले आहेत. डिसेंबर २०२१ मध्ये लग्न करणारे हे जोडपे या सीझनमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या स्पर्धकांपैकी एक आहेत पण टीव्ही आणि चित्रपटांमधील यशस्वी कारकीर्दीनंतर अंकिता लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये का सामील झाली? तिने बिग बॉस मध्ये येण्याचा निर्णय का घेतला हे तिने स्वतःच स्पष्ट सांगितले आहे.
अंकिताने बिग बॉस १७ मध्ये सहभागी होण्याच्या तिच्या निर्णयामागील खरे कारण उघड केले. अंकिता म्हणते “मी बिग बॉस १७ शोमध्ये आले आहे कारण लोक मला अर्चना म्हणून ओळखतात, आता त्यांनी अंकिताला ओळखावे, माझी खरी ओळख अंकिता म्हणून व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी जशी आहे तसं मला लोकांनी स्वीकारावं असं मला वाटतं.”
अंकिता “पवित्र रिश्ता” मधल्या अर्चना देशमुखच्या तिच्या प्रतिष्ठित भूमिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली. अंकिताने २००९ ते २०२४ पर्यंत पाच वर्षे अर्चनाची भूमिका केली आणि तिच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळवले. अंकिता लोखंडे ही बिग बॉस १७ मधील सर्वात लोकप्रिय आणि प्रिय स्पर्धकांपैकी एक आहे. तिला तिच्या चाहत्यांकडून आणि इंडस्ट्रीतील मित्रांकडून खूप पाठिंबा मिळत आहे आणि कौतुक होत आहे. शोमध्ये तिच्या उपस्थितीने प्रेक्षक खऱ्या अंकिता लोखंडेला बघण्यासाठी उत्सुक आहेत.
मुंबई : मुंबईच्या उत्तर भागातील विस्मृतीत गेलेल्या आणि अतिक्रमणांखाली दबलेल्या ११ तलावांना पुन्हा मोकळा श्वास…
मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा 'फॅण्ड्री' (Fandry Movie) हा…
जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…
व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…