Friday, March 21, 2025
Homeताज्या घडामोडीअंगणवाडी सेविका, मदतनीस सेविकांना मिळणार ‘भाऊबीज भेट’

अंगणवाडी सेविका, मदतनीस सेविकांना मिळणार ‘भाऊबीज भेट’

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : बालकांच्या आरोग्य व पोषणाची काळजी घेणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना यावर्षीही दिवाळीला भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी ३७ कोटी ३३ लाख २ हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

आदिती तटकरे म्हणाल्या, शून्य ते सहा वयोगटातील बालकांचे पोषण, स्तनदा माता, गरोदर महिलांना घरपोच पोषण आहार देणे, त्यांना मार्गदर्शन करणे, शासन व जिल्हा परिषदेच्या विविध योजना व उपक्रम राबविण्यात अंगणवाडी सेविकांचा मोठा सहभाग असतो. हीच बाब लक्षात घेऊन शासन त्यांच्यासाठी विविध निर्णय घेत आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षाकरिता कार्यरत अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना ‘भाऊबीज भेट’ वितरित करण्यात येणार आहे. भाऊबीज भेटीसाठी सदतीस कोटी तेहतीस लाख दोन हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या बाबतचा शासन निर्णय नुकताच महिला व बालविकास विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही मदत लवकरात लवकर जिल्ह्यात वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -