Friday, December 13, 2024
Homeताज्या घडामोडीएमडीची धास्ती : नाशिक शहर पोलिसांची विद्या मंदिर परिसरातील टपरीवर नजर

एमडीची धास्ती : नाशिक शहर पोलिसांची विद्या मंदिर परिसरातील टपरीवर नजर

सिडको (प्रतिनिधी) – नाशिक शहरातील ड्रग्स बनविण्याचा कारखाना मुंबई पोलिसांनी(mumbai police) उध्वस्त केल्यानंतर आता नाशिक(nasik) मधील पोलीस यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पोलीस प्रशासन व महापालिका यांच्या संयुक्त शाळा व कॉलेज जवळ अमली पदार्थ विक्री करणाऱ्या टप्प्यांवरती धडक कारवाई करण्यात आली.

शाळा व महाविद्यालयापासून १०० मीटर परिसरात कुठलेही अमली पदार्थ विक्री करण्यास बंदी असल्याचा नियम असताना अनेक शाळांच्या परिसरात अमली पदार्थ विक्री करण्याच्या टपऱ्या दिसून येत आहे याबाबत अनेक पालकांनी पोलिसांना तसेच शाळा व्यवस्थापनाला देखील तक्रारी केल्या आहेत याच तक्रारीची दखल घेत पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली.अंबड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, मनपा सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व महाविद्यालया जवळ असलेल्या अमली पदार्थ आणि गुटखा विक्री करीत असल्याच्या संशयावरून टपऱ्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये आंबडगाव मनपा शाळेजवळ,उत्तम नगर,सावता नगर या भागातील शाळा व महाविद्यालयाजवळ असलेल्या टपऱ्या पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आल्या.

एम डीची धास्ती :गो हत्यारे मोकाट-मुंबई पुणे पोलिसांनी नाशिक शहरातील एमडीचे रॅकेट उध्वस्त केल्यानंतर चर्चेत आलेल्या नाशिक शहर पोलिसांनी अचानक आक्रमक पवित्रा घेत शहराला नशा मुक्त करण्याचा जणू विडाच उचलला आहे. वरातीमागून घोडे दामटावे अशा पद्धतीने धडाधड कारवाया सुरु झाल्या असून शिक्षण संस्थांच्या परिसरातील पान टपऱ्या सध्या पोलिसांच्या निशाण्यावर आहेत.गेल्या अनेक दिवसापासून अस्तित्वात असलेल्या कायद्यान्वयेच या टपरीचालकावर आता कारवाया सुरु आहेत.अलीकडे पोलिसांचे काम एखादा ट्रेंड सुरु व्हावा अशा पद्धतीने सुरु झाल्याचे दिसते. विशिष्ट काळ निघून गेला की पुन्हा येरे माझ्या मागल्या.पोलिसांच्या या व्यस्ततेमुळे अन्य गुन्हेगारी मात्र बोकाळली.अर्थात मनुष्यबळासारख्या मर्यादा आहेतच.

एम डी माफियामुळे शहर पोलिस सध्या शहरातील पान टपऱ्या धुंडाळण्यात व्यस्त असल्याचा फायदा गो वंशाचे हत्यारे अलगद घेत आहेत . ग्रामीण भागातून गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक बिनधास्त सुरु असून शहरात तितक्याच बेडरपणे कत्तल सुरु आहे. गुरुवारच्या पहाटे वडाळा परिसरात किमान ७०/८० गोवंशाची कत्तल झाल्याची माहिती आहे.शहर पोलिसांना ना कत्तल खाना सापडतो, ना ग्रामीण पोलिसांना गोवंशाची बेकायदेशीर वाहतूक करणारी वाहने सापडतात…. सर्व यंत्रणा एकाच ध्येयाने प्रेरित झालेली दिसते.

एमडीचे रॅकेट चव्हाट्यावर आल्यानंतर पालक मंत्र्याच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत एक व्हाट्स ऍप नंबर जाहीर करण्यात आला. त्या नंबरवर माहिती देऊनही कारवाया होत नसल्याचा ताजा अनुभव आहे. पहाटे माहिती देऊन अवघ्या काही मिनिटात प्रतिसाद मिळूनही कारवाई मात्र झाली नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -