उदय पिंगळे: मुंबई ग्राहक पंचायत
जागतिक अर्थव्यवस्थेच्या क्रमवारीत ग्रेट ब्रिटनला मागे टाकून भारताने पाचव्या स्थानावर झेप घेतल्याच्या बातम्या आपण यापूर्वीच वाचल्या असतील. भारतासारख्या खंडप्राय देशात सांस्कृतिक विविधता आहे. वेगवेगळ्या प्रांतात विविध भाषा बोलणारे लोक एकत्रित राहतात. सण-उत्सव साजरे करतात. प्रचंड लोकसंख्या, लोकांमध्ये असलेली सर्वाधिक तरुणांची संख्या, स्थानिक विविधता, वैविध्यपूर्ण लोक, संस्कृती, धर्म, मनोरंजनाचे विविध प्रकार आणि त्यातून उपलब्ध होणाऱ्या संधी या सर्वांमुळे आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांच्या यादीत अग्रस्थानी आहे.
परदेशातील व्यावसायिक आणि गुंतवणूकदार अन्य कोणत्याही देशात गुंतवणूक करताना तेथील सकारात्मक गोष्टी कोणत्या आणि नकारात्मक कोणत्या, यांचा अभ्यास करून जर सकारात्मक गोष्टी अधिक असतील तरच गुंतवणूक करतात. भारतातील सकारात्मक गोष्टी अथवा घटना-वाढती लोकसंख्या त्यामुळे कायमच ग्राहकांची उपलब्धता साक्षरतेचे वाढते प्रमाण, इंग्रजी भाषेचा प्रभाव, मोठा जाणकार वर्ग केंद्रातील स्थिर सरकार, दुबळा विरोध, प्रभावहीन मित्रपक्ष वाढत असणारा परकीय चलनसाठा उच्च बाजारमूल्य असलेला, व्यवहारांची हमी घेणारा भांडवल बाजार अन्य देशांच्या तुलनेत मागील १० वर्षांत जीडीपीमध्ये सरासरी ५% हून अधिक वाढ, त्यामुळे लवकरच विकासदर दुहेरी आकड्यात बदलण्याची शक्यता.
तुलनेत ठळकपणे लक्षात येतील अशा नकारात्मक बाबी :
संपत्तीचे असमान वितरण, त्यामुळे वाढणारी गरिबांची संख्या विविध नियमकांची अकार्यक्षमता, त्यामुळे कागदोपत्री सगळं छान पण अंबलबजावणी प्रभावी पद्धतीने नाही. नोकरशाही, राजकीय दबाव, सबसिडीत सातत्याने होणारी वाढ यासारखी अर्थव्यवस्थेपुढे आव्हाने आहेत तरीही त्यातून सार्वत्रिक समाधान होईल असे मार्ग काढले जात आहेत. विविध आर्थिक निर्देशांक त्याच्याशी संबंधित माहिती परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यास मदत करतात, ते अधिकृत आणि विश्वासार्ह असावेत अशी अपेक्षा असते. ही माहिती सरकार, सरकारची विविध खाती, खासगी संस्था यांच्याकडून मिळवता येते.
माहिती मिळवण्याचे विविध मार्ग:
सरकारकडून प्रसारित केली जाणारी आकडेवारी-
सरकारच्या कॉमर्स मिनिस्ट्रीकडून सादर करण्यात येणारे रिपोर्टस त्याच्या संकेतस्थळावर प्रकाशित करून ते वेळोवेळी अपडेट केले जातात. अर्थ आणि उद्योग खात्याच्या संकेत स्थळाच्या मुख्य पानावर अनेक गोष्टी सहज दिसतील अशा पद्धतीने मांडल्या आहेत यात सर्व अहवाल, मुख्य निर्देशांक जसे सकल राष्ट्रीय उत्पादन, महागाई, कृषी उत्पादन, बेकारी, बचत, गुंतवणूक, मूलभूत व्यवसायातील वाढ, आयात-निर्यात, सरकारी रोख्यावरील व्याज यासारखे ३० हून अधिक निर्देशांक तपशीलवार उपलब्ध आहेत ते तेथून डाऊनलोड करूनही घेता येतात. मागील अहवाल पाहता येतात. त्याची चालू अहवालाशी तुलना करता येते. या सर्वांचा अभ्यासासाठी चांगला उपयोग होऊ शकतो.
नियोजन आयोगाकडून अर्थव्यवस्थेशी संबंधित २०० हून अधिक अहवाल पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध असून त्यातील काही महत्त्वाचे विषय असे-
याशिवाय विविध आर्थिक सर्वेक्षणे, नियोजन याचे अहवाल प्रकाशित केले जातात.
याशिवाय उपलब्ध अन्य मार्ग
या बँका अनुक्रमे आशियातील देशाशी संबंधित आणि जगातील सर्व देशांशी संबंधित वरील विषयांचेच विविध अहवाल प्रकाशित करीत असते. इंडिया इन बिझनेस ही समर्पित साइट विविध विभागांतर्गत अनेक तपशीलवार अहवाल प्रदान करते त्याच्या इतर विभागांमध्ये क्षेत्रनिहाय (कृषी, रिअल इस्टेट इ.) आर्थिक विश्लेषण, सर्वेक्षण आणि बजेट यासंबंधी माहिती मिळू शकते.
इंडेक्स मुंडी या लोकप्रिय संकेतस्थळावर जागतिक अर्थव्यवस्थेची माहिती देणारे आणि आर्थिक निर्देशाकांसाठी उपयुक्त संदर्भ मिळू शकतात. हे संदर्भ विविध देश आणि विविध भाषेत उपलब्ध आहेत. याशिवाय परदेशी गुंतवणूक संस्थांचे व्यावसायिक सल्लागार काही खासगी एजन्सीजद्वारे वरील अहवाल एकमेकांशी पडताळून पाहून त्यावरील त्याचे मत व्यक्त करणारा अहवाल देतात, त्याचाही गुंतवणूक करण्यापूर्वी विचार केला जातो.
विकासाच्या संकल्पनाच सध्या बदलत असून पूर्वी त्याचे मापन केवळ बेरोजगारी आणि गरिबीत झालेली घट यावर केले जात असे. त्याची जागा आता किती परकीय गुंतवणूक किती येते यावर केली जात आहे. यातही थेट गुंतवणूक आणि संस्थात्मक गुंतवणूक असे दोन प्रकार आहेत. संस्थात्मक गुंतवणूक ही भरवशाची म्हणता येत नाही, त्याने देशाची तात्पुरती गरज भागते. थेट परकीय गुंतवणूक विकासाला चालना देत असल्याने, तिला अधिकाधिक आकर्षित करण्याचे सरकारी धोरण असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
mgpshikshan@gmail.com-
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…