Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीPollution: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब, धुक्यामुळे लोकलचा वेगही मंदावला

Pollution: सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची हवा दिल्लीपेक्षाही खराब, धुक्यामुळे लोकलचा वेगही मंदावला

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई(mumbai) प्रदूषणाच्या(pollution) बाबतीत राजधानी दिल्लीला(delhi) मागे टाकत आहे. मुंबईने सलग तिसऱ्यांदा प्रदूषित शहर बनण्याच्या यादीत दिल्लीला मागे टाकले. मंगळवारपर्यंत मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक(Air Quality Index) ११३ इतका होता. गुरूवारी सकाळी हा आकडा वाढून १६१ इतका झाला आहे. दिल्लीपेक्षाही हा आकडा भयानक आहे. गुरूवारी सकाळपर्यंत दिल्लीचा AQI ११७ इतका होता.

वाहन प्रदूषणामुळे दिल्ली नेहमीच सगळ्यात जास्त प्रदूषित शहर राहिले आहे. येथे सर्वाधिक प्रदूषण साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात होते आणि दिवाळीत याचा स्तर धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. दिल्ली सरकार गेल्या काही वर्षांपासून या समस्येसाठी हरयाणा, पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना दोषी ठरवत आहे.

दरम्यान, मुंबईत धुक्याची चादरही दाट झालेली दिसत आहेय यामुळे AQI मध्ये मुंबईने दिल्लीला मागे टाकले. महाराष्ट्राचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले की मुंबईत सुरू असलेल्या निर्माण योजना, जसे मेट्रोची कामे हे प्रदूषण अधिक वाढवण्यास मदत करत आहेत. ते पुढे म्हणाले, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरात फॉगिंग मशीन लावली जात आहेत.

याशिवाय धुक्यामुळे लोकलचा वेगही मंदावला आहे. पीटीआयच्या बातमीनुसार मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, मुंबईच्या ठाणे जिल्ह्यातील वाशिंद आणि टिटवाळादरम्यान सकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत तसेच रायगड जिल्ह्याच्या कर्जत ते बदलापूर दरम्यान सकाळी साडेपाच ते ९ वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -