Monday, September 15, 2025

युद्धात अमेरिकेनंतर आता रशियाने घेतली एंट्री, बंदी केलेल्यांना सोडवण्यासाठी हमासशी बातचीत

युद्धात अमेरिकेनंतर आता रशियाने घेतली एंट्री, बंदी केलेल्यांना सोडवण्यासाठी हमासशी बातचीत

तेल अवीव: हमास(hamas) आणि इस्त्रायल(israel) यांच्यातील युद्ध ७ ऑक्टोबरपासून सुरू आहे. यात दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली आहे. दोन्ही बाजूंनी सुरू असलेले हे युद्ध आता विस्तारत चालल्याचे चित्र आहे. एकीकडे जिथे अमेरिका इस्त्रायलला खुलेपणाने समर्थन देत आहे तर हमासने रशियाशी संपर्क साधला आहे.

या दरम्यान २००हून अधिक इस्त्रायलच्या बंदी केलेल्यांना सोडण्याबाबत बातचीत झाली आहे. तर गाझा आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध कधीही जगात विस्तारू शकते. कारण जगातील दोन महाशक्तींनी या युद्धात उडी घेतली आहे. हे दोन देश आहेत अमेरिका आणि रशिया. या दोन्ही देशांच्या प्रमुखांनी केलेले विधान आणि कारवाईमुळे कोल्ड वॉरच्या आठवणी ताज्या केल्या.

युक्रेन युद्धादरम्यान रशियाची भूमिका आक्रमक होती. मात्र गाझा युद्धात बायडेनची भूमिका कडक होती. अमेरिकाने भूमध्यसागरात इस्त्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धपोत तैनात केले तेव्हा रशियाने ब्लॅक SEA मध्ये विध्वसंक मिसाईलने परिपूर्ण लडाखू विमाने तैनात केली आहेत.

इस्त्रायलविरुद्ध भडकले ५७ मुस्लिम देश

पॅलेस्टाईनपासून ते मिडल ईस्टच्या ५७ देशांमध्ये इस्त्रायलविरुद्ध रागाचा भडका उडाला आहे. इस्त्रायला या देशातून जोरदार विरोध होत आहे. असे वाटते आहे की मिडल ईस्ट थांबणार नाही आणि युद्ध सुरू राहिले तर त्याचा भडका आणखी वाढेल.

Comments
Add Comment