पुणे: भारत(india) आणि बांगलादेश(bangladesh) यांच्यात विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. हा विश्वचषकातील टीम इंडियाचा चौथा सामना आहे.. मात्र शुभमन गिलसाठी या स्पर्धेतील दुसरा सामना आहे.
हा सामना पाहण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरही आली आहे. यातच शुभमन गिलने कॅच पकडल्यावर सारा तेंडुलकरने व्यक्त केलेली प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. यात सारा अतिशय खुश दिसत होती.
गिलच्या कॅचने आनंदित झाली सारा
गिलने डावाच्या ३८व्या ओव्हरमध्ये शार्दूल ठाकूरच्या बॉलिंगवर तौहीद हृदयोचा कॅच पकडला. या कॅचचा व्हिडिओ आयसीसीने शेअर केला आहे. शार्दूलने ओव्हरच्या दुसऱ्या बॉलमध्ये शॉर्ट बॉल टाकला. याला फलंदाजाला लेग साईडवर मारायचे होते मात्र बॉल बॅटच्या वरच्या भागावर लागून हवेत गेला आणि सरळ शुभमन गिलच्या हाती पडला.
Shubman Gill took a catch and cameraman show sara tendulkar 👀👀 #INDvsBAN pic.twitter.com/6dkKn3x634
— Jashan (@Jashan1705) October 19, 2023
View this post on Instagram
गिलच्या या कॅचनंतर सोशल मीडियावर साराचा आनंदित झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये सारा आनंदाने टाळ्या वाजवाताना दिसत आहे. या कॅचमुळे बांगलादेशने पाचवा विकेट गमावला. तौहीद हृदयोय १६ धावा करून बाद झाला.
बांगलादेशच्या भारताविरुद्ध २५६ धावा
भारताविरुद्ध टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या बांगलादेश संघाने ५० षटकांत ८ बाद २५६ धावा केल्या. संघासाठी सलामीवीर लिटन दासने सर्वाधिक ६६ धावांची खेळी केली यात ७ चौकारांचा समावेश आहे. याशिवाय सलामीवीर तंजीद हसनने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५१ धावांची खेळी केली. या दरम्यान जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवले.