Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीSwami Samartha : स्वामींचे थोर भविष्यकार नानाजी रेखी

Swami Samartha : स्वामींचे थोर भविष्यकार नानाजी रेखी

  • समर्थ कृपा : विलास खानोलकर

पाठक घराण्यात झाला जन्म
ईश्वरी सेवा केली आजन्म।
भविष्य जगाचे कथिले आजन्म
स्वामींच्या पत्रिकेने
प्रसिद्ध झाले सातजन्म॥ १॥
स्वामीसुतांची पत्रिका
बनविण्याची आज्ञा
स्वामी प्रकट होऊनी
उजळविली प्रज्ञा।
जन्मपत्रिकेत नानांनी
रेखिली सज्ञा
स्वामींची नगरला
मठ स्थापण्याची आज्ञा॥ २॥
स्वामी दिधली अत्यानंदे टाळी
नानांची उघडली
नशिबाची टाळी
स्वामींच्या जन्मपत्रिकेने
प्राप्ती झाली नव्हाळी
नानांच्या घरी साक्षात
श्रीकृष्ण झाले गवळी॥ ३॥
बोला स्वामी समर्थ महाराज की जय!

नगर जिल्ह्याला जुना पौराणिक आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी नेवासे गावी ज्ञानेश्वरी हा ग्रंथराज लिहिला. नगर जिल्ह्यातील अनेक गावांना संत पुरुषांचा पदस्पर्श झालेला आहे. मच्छीद्रनाथ, गोरखनाथ, कानिफनाथ, आदिनाथ सारखे अनेक महान पुरुषांनी वास्तव्य करून तो प्रंत पावनच केला आहे. साईबाबांची शिर्डी, उपासनी बाबांची साकुरी, शंकर महाराजांची धनकवडी गाव जगप्रिसद्ध आहेत. नगर येथील शनी चौकातील गुजर गल्ली स्वामी समर्थांचा एक मठ सुप्रिसद्ध आहे. तेथील लक्ष्मीनारायण मंदिर नानाजी रेखी यांनी घरातच उभे केले आहे व त्यात स्वामींच्या जागृत पादुकांची स्थापना केली आहे.

नगर जिल्ह्यातील लक्ष्मेंद्र पाठक यांच्या वंशकुळात संकष्टीला माघ महिन्यात १८१८ ला नानांचा जन्म झाला. वाड-वडिलांपासून चालत आलेल्या भविष्य सांगणे, पूजा विधी, वेध पठण इ. कार्यात ते निष्णांत होते. त्यांनी कर्जतच्या सकुबाई भणगे या हुशार मुलीशी लग्न केले. श्रावण महिन्यात संकष्टी चतुर्थीला घरात पूजा-अर्चा चालू होती. सखुबाई मोदक बनवीत होत्या. तेवढ्यात समोरच्या खांबातून तेजस्वी बटू मूर्ती भिक्षा पात्र घेऊन अवतीर्ण झाली. “आई, भिक्षा वाढा” असे तीन वेळा उद्गारली. सखुबाई आश्चर्यचकित झाल्या व त्यांनी स्वत:ला सावरत बटूच्या झोळीत मोदक वाढले. क्षणार्धात ती तेजस्वी मूर्ती अंतर्धान पावली. नाना दुसऱ्या पूजेत व्यग्र होते. त्यांनी ओळखले काहीतरी चांगले भविष्यात घडणार आहे.

काही दिवसांनी मुंबईला मठात गेले असता स्वामीसुतांनी “नगरकर ज्योतिषी आपणच ना?” असे प्रथम भेटीत विचारले. त्यानंतर स्वामीसूतांनी स्वामींची जन्मकुंडली बनवून अक्कलकोटला जाण्यास सांगितले. तेथे स्वामींच्या दर्शनास गेल्यावर स्वामींनी त्यांच्या पत्नीला आपणच तुमच्या स्वप्नात आलो होतो असे सांगितले. त्यानंतर नानांनी सुंदर जन्मपत्रिका स्वामींच्या हातात दिली. स्वामींनी खूश होऊन नानांना शाबासकी दिली. नानांच्या हातावर टाळी दिली व हातावर विष्णुपद उमटले. त्या दिवसापासून नाना रेखी हे स्वामींचे जन्मपत्रिका बनविणारे भविष्यकार म्हणून जगप्रिसद्ध झाले.

नवरात्री स्वागतगीत

आली आली नवरात्री आली
उमा पार्वती आशीर्वादासह आली॥
आली स्वामी नवरात्री आली
नवरंग उधळत नवरात्री आली
इंद्रधनुष्याचे रंग उधळीत आले॥ १॥
समर्थांचे स्वागतास रविराज आले
सात घोड्यांचा रथ घेऊन आले॥ २॥
स्वामींच्या स्वागतास रविकिरण आले
समर्थच जणू पृथ्वीवर आले॥ ३॥
स्वामी समर्थ माझे आई,
धाव पाव घ्यावा आई॥ ४॥
स्वामी समर्थ माझे बाबाआई
खरेखरे ते साईबाबा साई ॥ ५॥
स्वामी समर्थ ताई-माई-आई,
तेच माझे मुक्ताई बहिणाबाई॥ ६॥
अक्कलकोटच माझे माहेर आई
केव्हा भेटण्यास येऊ मी आई॥ ७॥
स्वामींचा मठच वाटे आई
काशी, गया आणि वाई॥ ८॥
श्री गुरू स्वामी समर्थ,
जय जय स्वामी समर्थ॥ ९॥
तुम्ही दिलात जगण्याला अर्थ
सारे काम करतो मी नि:स्वार्थ॥ १०॥
गरिबांच्या सेवेत खरा अर्थ
अपंगांची सेवा हाच परमार्थ॥ ११॥
गरीब भुकेलेल्या अन्नदान,
राष्ट्रासाठी देईन देहदान॥ १२॥
स्वामी म्हणती व्हा मोठे
गोमातेसाठी बांधा गोठे॥ १३॥
पराक्रमाने महाराष्ट्र करा मोठे
एकतेने राष्ट्र करा मोठे॥ १४॥
स्वामींसाठी गुलाबाचा ताटवा
देह स्वामीचरणी
वहावा॥ १६॥
सुगंधात शरीराचा रोमरोम वहावा
आत्म्याने आपलाच देह पहावा॥१७॥
ओंकार स्वरूपात प्रवेश करावा
सारा देह सुगंधी-चंदन व्हावा॥१८॥
चंद्राला टाटा करिती सहर्ष
रवी किरणांचा गुलाबी स्पर्श॥ १९॥
समर्थ म्हणती तुम्ही व्हा मोठे
स्वामी करतील तुम्हाला मोठे॥ २०॥
देशसेवेने राष्ट्र करा मोठे मुलं-मुलींनो तुम्ही व्हा मोठे॥२१॥
चला स्वामी आले नववर्ष
झाला साऱ्यांना आनंद हर्ष॥ २२॥
इमान जागृत ठेवा मातीशी
जागृत राहा भारत मातेशी॥ २३॥
सारे जग तुझ्या पाठीशी
भिऊ नको स्वामी तुझ्या पाठीशी॥२४॥
स्वामी असता नेहमी दसरा
स्वभाव ठेव नेहमी
हसरा॥ २५॥
बोला स्वामी समर्थ महाराज की जय!

vilaskhanolkardo@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -