
वांद्रे पूर्व उड्डाणपुलावर गळफास लावून तरुणाने संपवले जीवन
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला दिलेल्या मुदतीची अंतिम तारीख आता जवळ आली आहे. त्यामुळे आरक्षणाविषयी काही चिन्हे दिसत आहेत की नाहीत, या बाबीवर मराठा समाज पुन्हा एकदा पेटून उठला आहे. या आंदोलनात पुढाकार असलेले आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी राज्यभर सभांचा सपाटा लावला आहे आणि त्यांच्या सभांना भरघोस प्रतिसादही मिळत आहे. अशातच मराठा आरक्षणासाठी आग्रही असणार्या ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर त्याने आत्मह्त्या केल्याने खळबळ उडाली आहे.
सुनील कावळे असं आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. हा तरुण मुळचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.