जळगाव : गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडल्यानंतरही कारवाई न करता ते सोडून दिल्याप्रकरणी पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ किरण शिंपी यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, पहूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गुटख्याची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून ते वाहन पोलिस उपनिरीक्षक अमोल गर्जे व पोहेकॉ अमोल शिंपी यांनी सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी रात्री पकडले होते. या वाहनावर कारवाई न करता ते साडून देण्यात आले. या विषयीचा अहवाल पहूर पोलिस ठाण्याकडून पोलिस अधीक्षक कार्यालयाला सादर करण्यात आला होता. त्यावर मंगळवारी, १७ ऑक्टोबर रोजी कार्यालयीन कारवाई सुरु करण्यात आली होती. त्यात वरील दोघांनाही निलंबित करण्यात येत असल्याचे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी बुधवारी, १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता काढले. या प्रकरणाची उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे चौकशी देण्यात आली आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra