ठाणे : म्हाडाच्या (Mhada) सहकारी गृहनिर्माण संस्थांचे (सोसायटी) पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघाने गृहनिर्माण सोसायट्यांसाठी ‘सहकार संवाद’ तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. या तक्रार निवारण पोर्टलचे लोकार्पण नुकतेच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचे तात्काळ निवारण होणार असल्यामुळे सोसायट्यांनी ‘सहकार संवाद’ या पोर्टलवर तक्रार करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी केले आहे.
‘आमची संस्था आमचे प्रश्न’ या टॅगलाईनअंतर्गत या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न २४ तासांच्या आत निवारण करण्यात येणार आहे.
तक्रारदाराने पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवताच संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेईल. तक्रार प्राप्त होताच तक्रारदार व्यक्तीला एसएमएसद्वारे किंवा ई-मेल आयडीवर संदेश पाठवला जाईल. पुढील कारवाईसाठी तक्रार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पाठवली जाईल. अधिकाऱ्यांकडून वेळेत तक्रार निवारण न झाल्यास पुन्हा त्या तक्रारीचा आढावा घेऊन संबधित अधिकाऱ्यांशी व्यक्तीशः संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तरीही तक्रारीचे समाधान न झाल्यास संबधित विभागाकडे अपील करता येईल, असे सीताराम राणे यांनी सांगितले.
या पोर्टलच्या माध्यमातून सहकार विभागासह इतर संबंधित विभागांना तक्रारी पाठवता येणार आहेत. त्यामुळे घरबसल्या तक्रारीचे निवारण होणार आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेऊन तक्रार निवारण जलद व्हावे. या हेतूने ‘सहकार संवाद’ या पोर्टलच्या माध्यमातून सहकार विभाग गृहनिर्माण सोसायट्यांच्या दारी आला आहे. तेव्हा, सोसायट्यांनी पोर्टलवर थेट तक्रार करून तक्रारीचे निवारण करून घ्यावे असे आवाहन सीताराम राणे यांनी केले.
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…