Monday, July 8, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023NZ vs AFG : न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानला १४९ धावांनी हरवले

NZ vs AFG : न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानला १४९ धावांनी हरवले

चेन्नई: न्यूझीलंडने विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) १६व्या सामन्यात अफगाणिस्तानला १४९ धावांनी हरवत स्पर्धेतील विजयी षटकार ठोकला आहे. सामन्यात पहिल्यांदा न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यानंतर गोलंदाजीतही न्यूझीलंडने जबरदस्त खेळी करताना अफगाणिस्तानला १३९ धावांवर रोखले. टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमने ५० षटकांत ६ बाद २८८ धावा केल्या होत्या.

ग्लेन फिलिप्सच्या ७१ आणि कर्णधार टॉम लाथमने ६८ धावांची खेळी केल्याने न्यूझीलंडला अडीचशे पार धावसंख्या रचता आली. गोलंदाजी फर्ग्युसन आणि सँटनर यांनी प्रत्येकी ३-३ विकेट मिळवल्या.

धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अफगाणिस्तानचा संघ ३४.४ षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला. संघासाठी रहमत शाहने ३६ धावांची सर्वाधिक खेळी केली. यात १ चौकाराचा समावेश आहे. अफगाणिस्तानचे बाकी फलंदाज चांगली खेळी करू शकले नाही. संघाने सुरूवातीपासून शेवटपर्यंत विकेट गमावले.

अफगाणिस्तानला पहिला झटका सहाव्या ओव्हरमध्ये २७ धावांवर रहमनुल्लाह गुरबाजच्या रूपात बसला. त्याने ११ धावा केल्या. पुढील ओव्हरमध्ये दुसरा सलामीवीर इब्राहीम जारदान १४ धावा करून बाद झाला. यानंतर १४व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला लौकी फर्ग्युसनने पॅव्हेलियनला धाडले. दरम्यान, काही काळ अफगाणिस्तानच्या विकेटला लगाम बसला. मात्र २६व्या ओव्हरमध्ये ट्रेंट बोल्टने अजमतुल्लाह उमरजईनला कीपर कॅचने बाद केले.

किवीच्या गोलंदाजांची कमाल

न्यूझीलंडसाठी लौकी फर्ग्युसन आणि मिचेल सँटनर यांनी सर्वाधिक ३-३ विकेट मिळवल्या. याशिवाय ट्रेंट बोल्ट २ फलंदाजांना बाद केले. तर मॅट हेन्री आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -