Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाNZ vs AFG: अफगाणिस्तानच्या फिल्डर्सनी न्यूझीलंडविरुद्ध सोडले ७ कॅच

NZ vs AFG: अफगाणिस्तानच्या फिल्डर्सनी न्यूझीलंडविरुद्ध सोडले ७ कॅच

चेन्नई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३चा(icc  १६वा सामना चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडियममध्ये न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होत आहे. सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र खुद्द कर्णधारसह अनेक खेळाडू खराब फिल्डिंगमुळे त्यांचा हा निर्णय महागडा ठरला.

पहिल्यांदा फिल्डिंग करताना अफगाणिस्तानने एकूण ७ कॅच सोडले. ज्यामुळे न्यूझीलंडला २८८ ही धावसंख्या गाठता आली. कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी, मुजीब उर रहमान आणि रशीद खान यांनी कॅच सोडले. रशीदने कठीण कॅच सोडला मात्र कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने २ सोपे कॅच सोडले.रशीदने कॅच सोडल्याने ग्लेन फिलिप्सला जीवदान मिळाले आणि त्यामुळे ग्लेनने ७१ धावांची खेळी केली.

अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी विल यंग, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स आणि किवी कर्णधार टॉम लॅथमसह अनेक खेळाडूंचे कॅच सोडले. सुटलेले काही कॅच आयसीसीकडून शेअर करण्यात आले आहे.

 

न्यूझीलंडच्या २८८ धावा

टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडने ५० ओव्हरमध्ये ६ बाद २८८ धावा केल्या. संघासाठी पाचव्या स्थानावर उतरलेल्या टॉम लाथमने ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ६८ धावा केल्या तर सहाव्या स्थानावर उतरलेल्या ग्लेन फिलिप्सने ४ चौकार आणि ४ षटकार ७१ धावा केल्या. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी १४४ धावांची भागीदारी केली.

एकवेळेस न्यूझीलंडच्या संघाने २१.४ षटकांत ११० धावांवर ४ विकेट गमावले होते. त्यावेळेस कर्णधार लाथम आणि ग्लेन फिलिप्सने शानदार खेळ केला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या मिळवू

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -