नाशिक: नाशिक शहरातील कॉफी शॉपमध्ये अनाधिकृतपणे कंपार्टमेंट पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरवत सदर ठिकाणी अंमली पदार्थाचे – सेवन व अश्लिल कृत्यांना आसरा दिला जात असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. याअनुषंगाने गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत पाहणी केली असता ०९ कॅफेमध्ये अनाधिकृतपणे अंतर्गत व बाह्य रचनेत अतिक्रमण करून बदल केला असल्याचे निदर्शनास आले. सदर अंतर्गत रचनेमुळे अंमली पदार्थ सेवन तसेच महिलांविरोधी गुन्हे घडण्यास पोषक स्थिती निर्माण करण्यात आली होती.
सदर कॅफे शॉपवर कारवाई करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे महानगरपालिकेस विनंती करण्यात आली होती. यानुसार कारवाईसाठी पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांची संयुक्त पथके निर्माण करून अनाधिकृतपणे कंपार्टमेंट/पार्टीशन तयार करून तरूण तरूणींना बेकायदेशिरपणे प्रायव्हसी पुरविणाऱ्या एकुण ०९ कॉफी शॉप मधील अनाधिकृत बांधकाम निष्काशित करण्यात आले. तसेच सदरच्या आस्थापणा महानगरपालिकेकडून सिल करण्यात आलेल्या आहेत.
कारवाई करण्यात आलेल्या आस्थापना :
१) सिझर कॅफे, हॉलमार्क चौक, कॉलेजरोड, नाशिक २) यारी कट्टा, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक
३) कॅफे क्लासिक डे लाईट, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक हॅरीज ४) किचन कॅफे, सुयोजित कॉम्पलेक्स, नाशिक
५) लकिन कैफे, थत्ते नगर, गंगापुर रोड, नाशिक ६) पॉकेट कॅफे, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक
७) बालाज कॅफे टेरीया, श्रध्दा मॉल, कॉलेजरोड, नाशिक ८) मुरली कॅफे, रामराज्य सोसायटी, महात्मा नगर, नाशिक
९) मॅझिक वर्ल्ड कॅफे, पी. एम. पी. एस. कॉलेज जवळ, डि. के. नगर, नाशिक
सदरची कारवाई पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, मनपा आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पो आयुक्त डॉ. सिध्देश्वर धुमाळ, गंगापूर रोड पो. नि श्रीकांत निंबाळकर सरकारवाडा पो. नि. दिलीप ठाकुर, मनपा उपायुक्त श्रीकांत पवार, अधीक्षक अभियंता संजय अग्रवाल,टाऊन प्लॅनिंगचे उप संचालक हर्षल बाविस्कर, हरिष चंद्रे, राजाराम जाधव, योगेश रकटे, विभागीय अधिकारी, म. न. पा. व पोलिस पथक यांनी केली असुन नाशिक शहरात यापुढे अशाच प्रकारच्या धडक कारवाया करण्यात येणार आहेत.