Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीMSP increased : सणासुदीच्या काळात मोदी सरकारची शेतकर्‍यांसाठी खुशखबर!

MSP increased : सणासुदीच्या काळात मोदी सरकारची शेतकर्‍यांसाठी खुशखबर!

यंदाची दिवाळी असणार खास…

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळीच्या (Diwali) पार्श्वभूमीवर अनेक निर्णय घेतले आहेत. सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक तसेच केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासोबतच शेतकर्‍यांसाठी (Farmers) देखील दिवाळीकरता केंद्र सरकार (Central Government) एक खुशखबर घेऊन आलं आहे.

दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने एमएसपी (MSP) म्हणजेच किमान आधारभूत किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ६ रब्बी पिकांचा एमएसपी वाढवण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने एमएसपी २% वरून ७% पर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली. या निर्णयाला सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली.

या ६ रब्बी पिकांसाठी एमएसपी वाढवला आहे :-

१. मसूरच्या एमएसपीमध्ये ४२५ रुपये प्रति क्विंटल वाढ

२. गव्हाच्या एमएसपीमध्ये १५०रुपये प्रति क्विंटल वाढ

३. हरभऱ्यासाठी एमएसपी १०५ रुपये प्रति क्विंटलने वाढला आहे

४. करडई पिकाच्या एमएसपीमध्ये १५० रुपये प्रति क्विंटल वाढ

५. बार्लीच्या एमएसपीमध्ये ११५ रुपये प्रति क्विंटलने वाढ

६. तेलबिया आणि मोहरीच्या एमएसपीमध्ये २०० रुपये प्रति क्विंटल वाढ

एमएसपीमुळे काय फायदा होतो?

केंद्र सरकार पिकांची किमान किंमत ठरवते, त्याला एमएसपी म्हणतात. त्यामुळे पिकांचे बाजारभाव जरी घसरले तरी केंद्र सरकार या एमएसपीवर शेतकऱ्यांकडून पिकांची खरेदी करते. एमएसपीचा उद्देश शेतकऱ्यांना नुकसानीपासून वाचवणे हा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -