Wednesday, April 30, 2025

विदेशताज्या घडामोडी

Israel Hamas War: १२ दिवसांनी गाझामध्ये पोहोचणार खाण्यापिण्याचे सामान

Israel Hamas War: १२ दिवसांनी गाझामध्ये पोहोचणार खाण्यापिण्याचे सामान

तेल अवीव: इस्त्रायल आण हमास यांच्यातील युद्ध सलग १२व्या दिवशीही सुरू आहे. यातच गाझाच्या रुग्णालयात झालेल्या हल्ल्याने प्रत्येकाला हैराण करून सोडले आहे. हमासचा दावा आहे की या हल्ल्यात तब्बल ५०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यामागे इस्त्रायल जबाबदार आहे. तर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले हमाच्या रॉकेटमुळेच हॉस्पिटलमध्ये स्फोट झाला.

यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन बुधवारी तेल अवीवला पोहोचले. येथे पंतप्रधान नेतन्याहून यांनी स्वत: त्यांचे स्वागत केले. यानंतर दोन्ही नेत्यांच्या बैठकी झाल्या. या दरम्यान गाझाच्या रुग्णालयात झालेल्या हल्ल्याबद्दलही चर्चा केली.

रुग्णालयातील हल्ल्यात इस्त्रायलचा हात नाही

यावर बायडेनने सांगितले की त्यांनी जे काही पाहिले त्यानुसार असे वाटते की गाझा रुग्णालयात झालेला स्फोट दुसऱ्या कोणत्या टीमने केला होता इस्त्रायलच्या सैन्याने नाही. यानंतर आता सवाल केले जात आहेत की गाझाच्या रुग्णालयात झालेल्या स्फोटासाठी कोण जबाबदार आहे.

ते म्हणाले, इस्त्रायल एकटा नाही. न्याय झाला पाहिजे. हमासच्या दहशतवाद्यांनी नरसंहार केला आहे. हमास पॅलेस्टाईनचे प्रतिनिधीत्व करत नाही. अमेरिका नागरिकांसोबत आहे. गाझाच्या नागरिकांना खाण्याची गरज आहे.

बायडेन यांनी गाझाच्या मदतीबाबत आवाज उठवला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले, गाझाच्या लोकांना भोजन, पाणी, औषध आणि शेल्टरची गरज आहे. आज मी इस्त्रायल कॅबिनेटला गाझातील नागरिकांना जीवन रक्षक मानवीय मदत प्रदान करण्यासाठी सहमत होण्यास सांगितले.

Comments
Add Comment