Monday, May 12, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

Lalit Patil drugs case : मी पळालो नाही तर पळवलं... ललित प्रकरणात आणखी काय नवीन खुलासे?

Lalit Patil drugs case : मी पळालो नाही तर पळवलं... ललित प्रकरणात आणखी काय नवीन खुलासे?

ड्रग्जबाबत महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी कारवाई... मुंबई पोलीस काय म्हणाले?


मुंबई : पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) फरार झालेल्या ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil) पोलिसांनी सापळा रचून पकडण्यात यश मिळवले आहे. मात्र, त्याच्या अटकेनंतर या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. 'ससूनमधून मी पळालो नाही तर मला पळवलं', असं वक्तव्य करत ललितने खळबळ उडवून दिली आहे. तसेच त्याला पळून जाण्यासाठी मदत करण्यात राजकीय कनेक्शन आहे, अशी चर्चा सुरु असल्याने आता यात नेमके कोणत्या राजकीय नेत्याचे नाव घेतले जाणार याने राजकारण्यांचे धाबे दणाणले आहेत.


ललित पाटीलने माध्यमांसमोर येत मला पळवण्यात कोणाचा हात होता, हे सर्व मी सांगणार आहे, असं म्हटलं आहे. नाशिक (Nashik) शहरातील शिंदे गावात ड्रग्जची फॅक्टरी (Drug Factory) सुरु असल्याचं प्रकरण उघडकीस आलं. त्यानंतर नाशिकमधीलच ललित पाटील आणि भूषण पाटील हे दोघे भाऊ यांचा हात असल्याचे समोर आले. त्यांना पकडल्यानंतर मात्र, ललित पाटील रुग्णालयातून पळून जाण्यात यशस्वी झाला.


पळ काढल्यानंतर ललित पाटील अनेक दिवस नाशिकमध्येच होता. नाशिक पोलीस, पुणे पोलीस तसेच मुंबई पोलीस मागावर असताना देखील ललित पाटील नाशिकमध्येच कसा? त्याला कोणाचा राजकीय पाठिंबा होता का? तपास यंत्रणांच्या शोध कार्याला गती येताच ललित पाटीलने नाशिकमधून पळ काढला. पण तो नाशिकमध्ये असताना कुणालाच कसा थांगपत्ता लागला नाही? मग तो कोणाच्या आश्रयाने नाशिकमध्ये राहत होता, की नाशिकमधीलच राजकीय नेत्यांचा (Political Leaders) हात त्याच्या पाठीशी होता, म्हणून तो बिनधास्त नाशिकमध्ये मुक्तसंचार करत होता? असे अनेक प्रश्न या निमित्ताने समोर आले आहेत.


नाशिकनंतर तो इंदोरला गेला, तिथून तो सूरतमध्ये गेला आणि पुन्हा नाशिक, धुळे, औरंगाबाद करत कर्नाटकात प्रवेश केला. दरम्यान तब्बल पंधरा दिवसांच्या तपासानंतर ललित पाटीलला चेन्नईमधून (Chennai) अटक करण्यात पोलिसांना यश आले. आज सकाळी जोगेश्वरी येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना मात्र ललित पाटीलने मोठा गौप्यस्फोट केला. 'मी लवकरच माध्यमांशी संवाद साधणार आहे. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, तर मला तिथून पळवण्यात आलं. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगणार आहे.' या ललित पाटीलच्या वक्तव्यामुळे मात्र नाशिकमधील काही नेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.



मुंबई पोलीस काय म्हणाले?


मुंबई पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले, "ऑगस्टपासून आम्ही कारवाई करत आहोत. ड्रग्ज फ्री महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत ही कारवाई केली. ललित ससून रुग्णालयातून पळाला याबाबत पुणे पोलीस चौकशी करतील. नाशिकमधील छाप्यानंतर आम्ही ललितच्या मागावर होतो. आतापर्यंत या प्रकरणात कोणतेही राजकीय कवनेक्शन समोर आले नाही. पलायन प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करतील", अशी माहिती यांनी दिली.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment