जाणून घ्या यातील प्रत्येक अक्षर काय दर्शवते?
समलैंगिक प्रेमप्रकरण म्हटलं की सर्वांच्या भुवया उंचावतात. कारण आपल्या समाजात अजून LGBTQIA+ याविषयी तितकीशी जनजागृती झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून भारतात LGBTQIA+ या गटात मोडणार्या अनेक जणांनी आपल्या भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. काहीजणांनी तर समलैंगिक विवाहदेखील (Same Sex marriage) केला आहे. मात्र, या गोष्टीला कायदेशीर मान्यता नसल्याने समाजात जोडपं म्हणून वावरताना त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आधुनिकतेकडे झपाझप पावले टाकणार्या भारतातील नव्या पिढीकडून या गोष्टीचाही स्विकार करण्यात येत आहे.
असं असलं तरी LGBTQIA+ समाजाविषयी बर्याच लोकांना तितकीशी कल्पना नाही. त्यामुळे या गोष्टी त्यांना लगेच रुचत नाहीत. LGBTQIA+ म्हणजे अशा लोकांचा समुदाय ज्यांच्या लैंगिक इच्छा (Sexual desire) काही प्रमाणात वेगळ्या असतात. एक व्यक्ती म्हणून त्यांच्या लैंगिक इच्छांना समाजात मान्यता मिळावी म्हणून त्यांनी स्वतंत्र लढा देण्यास सुरुवात केली आणि LGBTQIA+ समूदाय निर्माण झाला. जसं जसं समाजाने या लोकांबद्द्ल जाणून घेण्यास आणि त्यांना समजून घेण्यास सुरुवात केली तसं तसं वेगवेगळ्या लैंगिंक मनोकामना असलेल्या अनेक व्यक्ती पुढे आल्या आणि हा समुदाय वाढत गेला.
LGBTQIA+ यातील प्रत्येक अक्षर काय दर्शवते?
१. L लेस्बियन – L म्हणजेच लेस्बियन हा शब्द समलैंगिक महिलांसाठी वापरण्यात येतो. ज्या महिला इतर महिलांकडे आकर्षित होतात किंवा ज्यांना इतर महिलांची लैंगिक ओढ असते त्या लेस्बियन गटात येतात. काही वेळेस या महिलांना देखील इतर महिलांप्रमाणे नटायला सजायला आवडतं. तर काही महिला पुरुषांप्रमाणे राहाणं पसंत करतात.
२. G गे- G म्हणजेच गे हा शब्द समलैंगिक पुरुषांसाठी वापरला जातो. जे पुरुष इतर पुरुषांकडे आकर्षित होतात, पुरुषांशी लैंगिक संबध ठेवतात, भावनिकदृष्ट्या पुरुषांशी जोडले जातात त्यांना गे म्हटलं जातं.
३. B बायसेक्शुअल (Bisexual) – या गटातील महिला किंवा पुरुष एकंदर या गटातील कोणतीही व्यक्ती समान लिंगासोबतच इतर सर्व लिंगाच्या व्यक्तींकडे आकर्षित होतात यालाच बायसेक्शुअल म्हणतात. यात महिला किंवा पुरुष दोघं बायसेक्शुअल असू शकतात आणि ते इतर महिला किंवा पुरुषांसोबतच ट्रान्सजेंडर व्यक्तीशीही संबध ठेवू शकतात.
४. T ट्रान्सजेंडर (Transgender) – या व्यक्ती थर्ड जेंडरमध्ये येतात. या गटातील व्यक्ती ज्या लिंगाने जन्माला येतात तशी त्यांची आवडनिवड राहत नाही. म्हणजे पुरुष निंगाने जन्माला आलेला व्यक्ती जसजसा मोठा होता तशा त्याच्या आवडीनिवडी बाईप्रमाणे होत जातात. अगदी तसंच मुलीच्या लिंगाने जन्माला आलेली व्यक्ती पुढे जाऊन पुरुषाप्रमाणे वागू लागते. यातील अनेकजण अलीकडे सर्जरीच्या मदतीने लिंग देखील बदलून घेतात.
५. Q क्वीयर (Queer) – ज्या व्यक्ती त्यांची लैंगिक ओढ किंवा त्यांचं आकर्षण नेमकं कुणासाठी आहे हे ठरवू शकत नाहीत, म्हणजेच जे स्वत:ला पुरुष, महिला किंवा ट्रान्सजेंडरही मानत नाहीत त्यांना क्वियर म्हणतात. ते पूर्णपणे लेस्बियन नसतात किंवा गे आणि बायसेक्शुअलही नसतात. त्याचं लैंगिक आकर्षण वेळोवेळी बदलत राहतं. म्हणून क्वियरचा क्यू Q हा QUESTIING या अर्थाने ओळखला जातो.
६. I इंटरसेक्स (Intersex) – जन्मत: ज्या व्यक्तींच्या जननेंद्रियांमध्ये म्हणजे प्रायव्हेट पार्टमध्ये काही दोष असतात किंवा यावरून ते नेमके स्त्री आहेत कि पुरुष हे लक्षात येत नाही त्यांना इंटरसेक्शुअल म्हणतात.
७. A एसेक्शुअल (Asexual) – ज्या व्यक्तीला कोणत्याही लिंगाच्या व्यक्तीसोबत सेक्स म्हणजेच शारिरीक संबंधांसाठी रुची नसते त्यांना एसेक्शुअल म्हणतात.
तर प्लस (+) मध्ये अशा व्यक्तींचा समावेश होतो जे LGBTQIA च्या कोणत्याचं गटात बसत नाहीत. यातील कोणत्याच गटात आपण फिट बसत नाहीत मात्र आपली लैंगिक गरज हे सामान्यांपेक्षा विभिन्न आहे असं ज्यांना वाटतं ते या गटात येतात.