नवी दिल्ली: हमास(hamas) आणि हिजबुल्लाह यांच्याविरोधातील लढाईत इस्त्रायलला मोठे यश मिळाले आहे. इस्त्रायलच्या सेनेने केलेल्या हवाई हल्ल्यात अयमान नोफलला कंठस्नान घालण्यात यश आले आहे. हा हमासचा वरिष्ठ कमांडर असल्याचे सांगितले जात आहे. इस्त्रायल सेनेच्या माहितीनुसार अयमान हमासच्या जनरल मिलिट्री कौन्सिलचा सदस्य होता. याशिवाय इस्त्रायलच्या सेनेने दहशतवाही संघटना हिजबुल्लाहच्या दोन दहशतवाद्यांनाही मारले.
इस्त्रायल यावेळेस दोन मोर्च्यांवर लढाई लढत आहे. एकीकडे ते गाझा पट्टीवरून होणाऱ्या हमासच्या हल्ल्यांना उत्तर देत आहे. दुसरीकडे लेबनान येथून हिजबुल्लाहचे दहशतवादी हल्ले करत आहे. याच्या प्रत्युत्तरात इस्त्रायलकडून हवाई हल्ला केला जात आहे.
अबू हमासचा कमांडर मारला गेल्याची माहिती इस्त्रायलच्या सेनेने दिली आहे. तर हवाई हल्ल्यात आपले सदस्य मारले गेल्याची खबर हिजबुल्लाहने खुद्द मान्य केली आहे. हिजबुल्लाहने यांचे नाव अब्बास फैसी आणि मोहम्मद अहमद काजिम असे सांगितले आहे.
हिजबुल्लाहने एक व्हिडिओही जारी केला आहे. यात संघटनाने एका कारला निशाणा बनवताना मिसाईल डागले आहे. हा हल्ला इस्त्रायलच्या मेटुला शहरावर होत आहे.