श्री. देविदास पावशे शास्त्री, गोराई-२. बोरिवली, (प.)
नवरात्र/घटस्थापना रविवार १५ ऑक्टोबर रोजी सुरू झाली व सोमवार दिनांक २३ ऑक्टोबर २३ रोजी संपतेय. नंतर २४ ऑक्टोबरला दसरा आहे. या नवरात्रोत्सव कालावधीत देवी महात्म्य, धार्मिक विधींबाबत सर्वसामान्य नागरिकांना जिज्ञासा आहे. या नवरात्रीतील दिवसाचे महत्त्वही जाणून घेता येईल.
नवरात्रीची ४ प्रमुख अंगे आहेत
१) देवता स्थापन २) मालाबंधन
३) अखंड नंदादीप ४) कुमारिका पूजन..
नवरात्र बसवल्यावर ज्या देवतेचे ‘नवरात्र’ असते त्या देवतेची पूजा करताना देवाचा / देवीचा टाक न हलवता फुलांनी किंचित पाणी शिंपडून, रोज फुले बदलून पूजा करावी. तर इतर देव नेहमीप्रमाणेच ताम्हणात घेऊन दूधपाणी घालून रोजच्यासारखी पूजा करावी, मात्र काही लोक नवरात्र बसविल्यावर इतर देवांचीही पूजा करीत नाहीत, देव हलवित नाहीत हे शास्त्राला धरून नाही. हा समज निव्वळ चुकीचा आहे.
प्रकृती खराब असेल – झेपणार नसेल तर वयोमानापरत्वे शक्य नसेल तेव्हा नवरात्र बसवितानाचा पहिला दिवस व शेवटचा दिवस (उठता-बसता) असे २ व नवमीचा १ असे ३ दिवस उपवास केला तरी चालतो किंवा फक्त अष्टमीचाही उपवास करता येईल आणि नवमीस धान्य फराळ (भाजके अन्न) करावा.
नवरात्रात ‘अखंड नंदादीप’ लावला जातो. त्यावर काजळी आल्यावर तो विझतो अगर वाऱ्याने, हवेने विझतो / मालवतो, ते अशुभ नाही. कुठलीही शंका न घेता दिव्याची वात स्वच्छ करून काजळी काढून वा बदलून तो परत लावावा ते आत १-२ कापराच्या वड्या बारीक करून टाकल्या तर काजळी येत नाही आणि वात मंद व शांत जळत राहील व प्रकाशही स्वच्छ पडेल.
देवीस बाहेरून वस्तू आणून वाहतांना स्वच्छ करून वाहाव्यात(जसे फुले,तुळशीपत्र, दुर्वा, इत्यादी). शक्यतो घरात तयार केलेलेच पदार्थ नैवेद्यास ठेवावेत श्रध्देने. आत्मसमर्पणाने, आनंदाने उत्सव साजरा करावा. म्हणजे त्याचे चांगले फळ मिळते.
अष्टमीचे पूजनासाठी रात्रौ १२ ते १ ही वेळ घ्यावी. कारण त्या आधी कधी – कधी सप्तमी असू शकते. दसरा (विजया दशमी) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने तो शुभ मानतात. पण त्या दिवशी विवाह – वास्तू निक्षेप/शांती इ.शुभ कामे करू नयेत. कारण अश्विन महिना हा त्यासाठी त्याज्य आहे. मात्र वाहन खरेदी, घर खरेदी,कलशपूजन इ.करू शकता.
* नवरात्र म्हणजे ९ दिवस असते असे नाही. काळ्या मातीत सप्त धान्य हळदीच्या पाण्यात बुडवून पेरावेत. घट बसविल्यावर रोज सुवासिक फुलांची माळ बाधांवी. शक्यतो परान्न (दुसऱ्याचे घरी) घेऊ नये. ब्रम्हचर्य पालन करावे. पलंग, गादी, दाढी, कटिंग वर्ज्य करावे.
नवरात्रात नवदुर्गा ९ आहेत त्याप्रमाणे रोज एकीचे पूजन केले जाते त्या अशा आहेत.
रोज एका कुमारीकेस वाढत्या वयाच्या क्रमाने बोलावून तिचे पाद्यपूजा, दुग्धपान, फलाहार, अल्पोपहार देऊन शेवटचे दिवशी जेवण – वस्त्र – अलंकार-उपयोगी वस्तू देऊन पुजन करून आशीर्वाद घ्यावेत.
स्कंद पुराणात वयानुसार कुमारिका पूजन व त्याचे फळ सांगितले आहे. देवी व्रतांमध्ये कुमारिका पूजन परमावश्यक आहे / असते.
* प्रत्येकवारी कोणता नैवेद्य दाखवावा ते देवी भागवतात सांगितले आहे. ते पुढीलप्रमाणे असे…
बऱ्याच ठिकाणी सप्तशती पाठ करण्याची पद्धत आहे. ते कोणत्या कार्यासाठी किती करावेत ते असे.
फल सिद्धीसाठी … १ पाठ
उपद्रव शांतीसाठी … ३ पाठ
भयमुक्तीसाठी …७ पाठ
यज्ञफल प्राप्तीसाठी …९ पाठ
राज्य प्राप्तीसाठी …११ पाठ
कार्य सिद्धीसाठी …१२ पाठ
सुख संपत्तीसाठी …१५ पाठ
बंध मुक्तीसाठी …२५ पाठ
प्रिय व्यक्ती प्राप्ती … १८ पाठ
अनिष्ट ग्रह निवारण …२० पाठ
▪शत्रू, राजा,रोग,भय …१७ पाठ
▪पुत्र,धन प्राप्तीसाठी …१६ पाठ
▪एखाद्याला वश करणे …१४ पाठ
▪सामान्यतः सर्व प्रकारच्या शांतीसाठी …५ पाठ
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…