Monday, October 7, 2024
Homeताज्या घडामोडीकोळीला घाबरून महिलेने चालत्या कारमधून घेतली उडी आणि...

कोळीला घाबरून महिलेने चालत्या कारमधून घेतली उडी आणि…

नवी दिल्ली : जगात अशी फारच क्वचित माणसे असतील ज्यांना कशाची भीती वाटत नसेल. काहींना उंचीची भीती वाटते तर काहींना पाण्याची. काही लोकांना सापाची भीती वाटते तर काहींना कुत्र्याची. अनेक प्रकारच्या किड्यांचीही लोकांना भीती वाटते. अनेकजण तर कोळ्यालाही घाबरतात. अमेरिकेत एक महिला तर कोळ्याला इतकी घाबरली की तिने चालत्या कारमधून उडी घेतली. या घटनेवरून तुम्हाला अंदाज येऊ शकतो की ती महिला किती घाबरली असेल?

अमेरिकेच्या जॉर्जिया राज्यातील एक महिला आपली कार नदीच्या किनाऱ्यावर पार्क करत होती. ज्यामुळे तिला आपली छोटी नाव नदीत उतरवता येईल. ती आपल्या घरातून छोटी नाव कारच्या वर ठेवून आली होती. तिने कार पूर्णपणे नदीच्या किनारी लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे थोडासा धक्का दिला तरी कारच्या छतावर असलेली नाव नदीत उतरेल. महिलेचा प्लान चांगलाच होता मात्र त्यादरम्यान असे काही घडले की याची तिने कल्पनाच केली नव्हती.

नदीत अशी बुडाली कार

महिला जेव्हा आपली कार नदीच्या किनाऱ्यावर पार्क करत होती त्यादरम्यान तिच्या मांडीवर कोळी पडला. ती कोळ्याला पाहताच इतकी जोरात ओरडली आणि सीट बेल्ट काढून कारच्या बाहेर तिने उडी मारली. जेव्हा तिने असे केले तेव्हा कार रिव्हर्समध्ये होती. महिला इतकी घाबरलेली होती की ती कारपासून खूप दूर गेली आणि तिने कार नदीत बुडत असल्याचे पाहून वाचवण्याचाही प्रयत्न केला नाही. यामुळे तिच्या डोळ्यावर तिची कार आणि नाव दोन्हीही इटोवाह नदीत बुडाले.

या महिलेने जॉर्जिया स्टेट पेट्रोलटीमला या महिलेने माहिती दिली. मात्र टीम जोपर्यंत नदी किनारी पोहोचली तोपर्यंत कार आणि नाव दोन्हीही नदीत बुडाले होते. कार काही सेकंदातच नदीच्या आत गेली. नदीच्या बाजूला असलेल्या नावेच्या सहाय्याने कारला शोधण्याचा प्रयत्न केला गेला मात्र यश मिळाले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -