पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाने राष्ट्रीय स्मारकाचा मार्ग मोकळा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भात दाखल याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने भिडे वाड्यात राष्ट्रीय स्मारक होण्याचा मार्ग मोकळा झाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले.


पुण्यातील भिडे वाडा येथे महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. ही वास्तू महिलांसाठी प्रेरणास्थान आहे. भावी पिढीने देखील त्यातून सामाजिक कार्याची आणि शिक्षणाची प्रेरणा घ्यावी यासाठी या वाड्याचा राष्ट्रीय स्मारक म्हणून विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.


स्मारकासाठी झालेल्या भूसंपादनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात वाड्यातील भाडेकरूंनी याचिका दाखल केली होती. त्यावर आज झालेल्या सुनावणीत वाड्याची जागा स्मारकासाठी देण्याच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामुळे स्मारकासाठीच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला असून स्मारकाच्या कामाला गती येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारकासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. गेल्या वर्षी नागपूर येथे झालेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान मुख्यमंत्र्यांनी स्मारकाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक घेतली होती. त्याचबरोबर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्व बाबींची पूर्तता करून स्मारकाच्या कामाला लवकरच सुरूवात करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.

Comments
Add Comment

ईव्हीएम सुसज्ज करण्याच्या कामाची राज्य निवडणूक आयुक्तांकडून पाहणी

मुंबई : राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज विल्सन महाविद्यालयास भेट देऊन बृहन्मुंबई महानगरपालिका

पाणंद रस्ते समितीत सह अध्यक्षांसह परिषद सदस्य अन पाच प्रगतशील शेतकरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय योजना प्रभावी करण्याचे चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांचे

धक्कादायक! बापाचं संतापजनक कृत्य, चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलाला दिले....

मुंबई : मुंबईच्या गोरेगाव परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गोरेगाव येथे वडिलांनी आपल्याच मुलांना

Ambarnath News : अंबरनाथचे काँग्रेसचे १२ नगरसेवक भाजपच्या वाटेवर; मोठी खळबळ

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

Madhav Gadgil dies : एका 'व्रतस्थ' पर्यावरण शास्त्रज्ञाला आपण मुकलो! डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनाने पर्यावरणाची मोठी हानी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भावपूर्ण श्रद्धांजली

"ते केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर 'जनतेचे वैज्ञानिक' होते"; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या डॉ. गाडगीळांच्या आठवणी मुंबई :

कोट्याधीश उमेदवार! लाखोंची गाडी, लाखोंची मालमत्ता.. जाणून घ्या 'या' उमेदवारांच्या संपत्ती विषयी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. नवनवे उमेदवार आपले नशीब आजमावू पाहत आहेत. तसेच काही