लखनऊ: लखनऊच्या इकाना स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलिया(australia) आणि श्रीलंका(srilanka) यांच्यात खेळवल्या जात असलेल्या सामन्यात चाहते थोडक्यात वाचले. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात आजचा हा विश्वचषकातील १४वा सामना खेळवला जात आहे. सामन्यात पाऊस आणि वादळामउळे खेळाडूंसह चाहत्यांनाही हैराण केले. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत चाहते थोडक्यात बचावताना दिसले.
व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की स्टँड्समध्ये एक फलक वादळामुळे पडतो. यामुळे तेथील प्रेक्षक थोडक्यात बचावतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ज्या ठिकाणी फलक पडतो तेथे कोणी प्रेक्षक उपस्थित नसतात. दरम्यान, हा फलक पडल्याने प्रेक्षक चांगलेच घाबरले. तसेच काही वेळासाठी गोंधळही झाला.
Ekana stadium Lucknow
Australia v. Sri Lanka pic.twitter.com/Z3ZasLsegx— Samyak Mordia (@SamyakMordia) October 16, 2023
यानंतर प्रेक्षकांना दुसऱ्या ठिकाणी बसायला सांगण्यात आले. सामन्याचा दुसरा डाव पाऊस तसेच वादळामुळे काही वेळ उशिरा सुरू झाला. सामन्याच्या पहिल्या डावातही पावसामुळे व्यत्यय आला होता. पहिल्या डावादरम्यान ३३व्या ओव्हरमध्ये पाऊस आला होता. यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. यावेळेस ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेविड वॉर्नरचाही एक फोटो व्हायरल झाला होता. यात तो ग्राऊंड स्टाफसोबत कव्हर्स खेचताना दिसला होता.
२०९ धावांवर आटोपला श्रीलंकेचा डाव
टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या श्रीलंकेला चांगली सुरूवात मिळाली. सलामीसाठी उतरलेल्या कुशल परेराने १२ चौकारांच्या मदतीने ७८ धावा ठोकल्या तर पाथुम निसंकाने ८ चौकार लगावत असताना ६१ धावा केल्या. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. दरम्यान, यानंतर मात्र कोणताही फलंदाज चांगली खेळी करू शकला नाही. पाचव्या स्थानावर उतरलेल्या चरिथ असलंकाने १ षटकार ठोकत २५ धावा केल्या आणि दशकी आकडा पार केला. तर बाकी ८ फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाही. या पद्धतीने ४३.३ ओव्हरमध्ये २०९ धावांवर संपूर्ण संघ ऑलआऊट झाला.