
मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रौतेला(urvashi rautela) शनिवारच्या रात्री अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पोहोचली होती. या दरम्यान अभिनेत्रीसोबत मोठी घटना घडली. खरंतर या अभिनेत्रीचा आयफोन स्टेडियममध्ये कुठेतरी हरवला होता. याची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली आहे.
स्टेडियममध्ये हरवला उर्वशी रौतेला आयफोन
गेल्या रात्री उर्वशी रौतेला भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचली होती. तेव्हा अभिनेत्रीचा २४ कॅरेट गोल्ड आयफोन स्टेडियममध्ये हरवला. याची माहिती उर्वशीने सोशलम मीडियावर दिली. तिने यासाठी अहमदाबाद पोलिसांना टॅग करत लिहिले, माझा २४ कॅरेट आयफोन नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हरवला आहे. प्लीज कोणाला भेटला तर लगेचच संपर्क करा. आपली ही पोस्ट अभिनेत्रीने इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरही शेअर केली आहे.
View this post on Instagram
उर्वशीने शेअर केला होता स्टेडियमचा व्हिडिओ
याआधी उर्वशी रौतेलाने आपला स्टेडियममधून एक व्हिडिओ शेअर केला होता. यात ती भारत विजयाच्या दिशेने जात असताना खूप खुश दिसत होती. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी ती निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला होता. याआधीही उर्वशी अनेकदा सामन्यामध्ये संघाला चीअर करताना दिसली.
एल्विश यादवसोबत गाण्यामध्ये दिसली होती उर्वशी रौतेला
कामाच्या बाबतीत बोलायचे झाल्यास उर्वशी रौतेला काही दिवसांपूर्वी बिग बॉस ओटीटी २ विजेता एल्विश यादवसोबत एका म्युझिक अल्बममध्ये दिसली होती. दोघांना या गाण्यातून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.