Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाज‘सिंधूताई माझी माई’मध्ये नव्या अध्यायाचा प्रारंभ

‘सिंधूताई माझी माई’मध्ये नव्या अध्यायाचा प्रारंभ

कलर्स मराठीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई – चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अशा जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री.

आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी पाहिली. आता मात्र चिंधीने सिंधू बनण्याचा विलक्षण प्रवास सुरु होणार आहे. सिंधूच्या जीवनातील अनेक आव्हाने, कठीण प्रसंग, हलाखीची परिस्तिथी आणि यामधून मार्ग काढत त्यांनी सिंधू बनण्याचा प्रवास कसा पार केला हे सगळे आत्मा हेलावून ठेवणारे आणि मन सुन्न करुन जाणार आहे.

त्यांचा हा खडतर प्रवास आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे सारे बघणे प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे आणि प्रेरणा देणारे ठरणार आहे. ‘सिंधुताई माझी माई’ मालिकेच्या उत्तम कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आणि याच उद्दिष्टाला पुढे नेत आणखी भावनिकदृष्ट्या कथानक सादर करण्याचा प्रयत्न मालिकेचा असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -