मुंबई: अश्विन शुक्ल पक्षातील शारदीय नवरात्रौत्सवाला(Shardiye Navratri 2023) आजपासून प्रारंभ होत आहे. यावेळेस नवरात्रौत्सवाला १५ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. तर २४ ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी याचे समापन होईल. घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या नावाने कलशाची स्थापना केली जाते.
नवरात्रीत अनेकजण नऊ दिवसांचा उपवास करतात. हे नऊ दिवस अतिशय चैतन्याने आणि उत्साहाने सळसळणारे असे असतात.
जाणून घ्या काय आहे घटस्थापनेचा मुहूर्त
नवरात्रीत घटस्थापना पहिल्या दिवशी प्रतिप्रदेला केली जाते. घटस्थापना अभिजीत मुहूर्तावर करणे शुभ मानले जाते. हा मुहूर्त १५ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपासून ते १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत आहे. तुम्ही या ४६ मिनिटांच्या कालावधीत घटस्थापना करू शकता.
असे आहेत नवरात्रीचे हे नऊ दिवस
रविवार १५ ऑक्टोबर – देवी शैलपुत्री(पहिला दिवस)
सोमवार १६ ऑक्टोबर – देवी ब्रम्हचारिणी(दुसरा दिवस)
मंगळवार १७ ऑक्टोबर – देवी चंद्रघंटा(तिसरा दिवस)
बुधवार १८ ऑक्टोबर – देवी कुष्मांडा(चौथा दिवस)
गुरूवार १९ ऑक्टोबर – देवी स्कंदमाता (पाचवा दिवस)
शुक्रवार २० ऑक्टोबर – देवी कात्यायनी(सहावा दिवस)
शनिवार २१ ऑक्टोबर – देवी कालरात्री(सातवा दिवस)
रविवार २२ ऑक्टोबर – देवी महागौरी(आठवा दिवस)
सोमवार २३ ऑक्टोबर – महानवमी (नववा दिवस)
मंगळवार २४ ऑक्टोबर – दुर्गा मातेचे विसर्जन(दहावा दिवस, दशमी)