अहमदाबाद: आयसीसी वनडे विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचा भारताचा विजयीरथ कायम राहिला आहे. विश्वचषक २०२३मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये महामुकाबला खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेटनी विजय मिळवला.
वर्ल्डकपच्या इतिहासात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत आणि सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. वर्ल्डकपमध्ये भारताप्रमाणेच पाकिस्तानच्या संघानेही श्रीलंकेविरुद्ध ८ सामने खेळले आहेत आणि सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या पद्दतीने दोन्ही संघांचा संयुक्तपणे मोठा रेकॉर्ड आहे.
अशा पद्धतीने १३ असे मोठे रेकॉर्ड आहेत जे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान झाले. भारताचा कर्णधार रोहित शर्माही वनडेमध्ये सिक्सर किंग ठरला आहे. तो ३०० हून अधिक सिक्सर ठोकणारा भारतीय बनला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आधीच त्याच्या नावावर सर्वाधिक सिक्सरचा रेकॉर्ड आहे.
विश्वचषकात एकाच संघांविरुद्ध न हरता जिंकण्याचा रेकॉर्ड
८-० पाकिस्तान vs श्रीलंका
८-० भारत vs पाकिस्तान
६-० वेस्टइंडीज vs झिम्बाब्वे
६-० न्यूझीलंड vs बांगलादेश
वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध भारताचा विजय
मार्च १९९२ सिडनी, ४३ धावांनी हरवले
मार्च १९९६, बंगळुरू , ३९ धावांनी हरवले
जून १९९९, मँचेस्टर, ४७ धावांनी हरवले
मार्च २००३, सेंच्युरियन, ६ विकेटनी हरवले
मार्च २०११, मोहाली, २९ धावांनी हरवले
फेब्रुवारी २०१५, अॅडलेड, ७६ धावांनी हरवले
जून २०१९, मँचेस्टर, ८९ धावांनी हरवले
ऑक्टोबर २०२३, अहमदाबाद, ७ विकेटनी हरवले
विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड
४९ – क्रिस गेल
३७ – एबी डिविलियर्स
३४* – रोहित शर्मा
३१ – रिकी पोंटिंग
२९ – ब्रेंडन मॅकक्युलम