Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजराहुल चोपडा साकारणार ‘गडकरी’

राहुल चोपडा साकारणार ‘गडकरी’

ऐकलंत का!: दीपक परब

भारताचे हायवेमॅन म्हणजेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित असणारा ‘गडकरी’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सामान्य नागरिकांसाठी असामान्य कार्य करणाऱ्या या नेत्याला जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर, टिझर झळकल्यानंतर प्रेक्षकांना उत्सुकता होती ती, नितीन गडकरी यांची भूमिका कोण साकारणार याची. आता या चित्रपटाचे दुसरे पोस्टर झळकले असून यातील ‘गडकरी’ यांचा चेहरा समोर आला आहे. कोणता अभिनेता नितीन गडकरी यांची भूमिका साकारणार आहे? असा प्रश्न अनेकांना पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.

गडकरी यांची भूमिका राहुल चोपडा साकारणार आहे, तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच कांचन गडकरी यांची भूमिका ऐश्वर्या डोरले साकारणार आहे. या व्यतिरिक्त या चित्रपटात नितीन गडकरी यांच्या मित्रांच्या भूमिकेत अभिलाष भुसारी, पुष्पक भट, अभय नवाथे, वेदांत देशमुख दिसतील, तर पत्रकाराची भूमिका तृप्ती प्रमिला केळकर हिने साकारली आहे. अनुराग राजन भुसारी दिग्दर्शित ‘गडकरी’ हा चित्रपट येत्या २७ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ‘गडकरी’ची कथा, पटकथाही अनुराग राजन भुसारी यांची असून अनुराग भुसारी, मिहिर फाटे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

एएम सिनेमा व अभिजीत मजुमदार प्रस्तुत, अक्षय देशमुख फिल्म्स निर्मित ‘गडकरी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. हा चित्रपट अशा एका व्यक्तिमत्त्वावर आधारित आहे ज्याचे कर्तृत्व केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून त्याची दखल भारताबाहेरही घेण्यात आली आहे. असे व्यक्तिमत्त्व कसे घडले, हे ‘गडकरी’मधून दाखविण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिग्दर्शक भुसारी यांचे म्हणणे आहे. मुळात त्यांच्या रक्तातच समाजसेवा होती, तरी त्यांच्या या कारकिर्दीत त्यांच्या मित्रांचा, त्यांच्या अर्धांगिनीचा तितकाच सहभाग होता. कलाकारांच्या निवडीबद्दल सांगायचे, तर राहुल चोपडा या भूमिकेत चपखल बसतात. त्यांची देहबोली, कठोर तरीही प्रसंगी हळवे मन या विविध छटा राहुल यांनी उत्तम साकारल्या आहेत, तर खंबीरपणे पतीच्या पाठीमागे राहणाऱ्या कांचनताईही ऐश्वर्या यांनी सुरेख साकारली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -